
Weather Update Sangli : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागासह धरण पाणलोट क्षेत्रात गेले चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मात्र तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. वारणा धरणात २४ तासात ६९, तर आठ तासात १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने चांदोलीत सलग तीन दिवस अतिवृष्टी झाली आहे.