बेळगाव शहर आणि परिसराला पावसाने झोडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy rains lashed Belgaum city

बेळगाव शहर आणि परिसराला पावसाने झोडपले

बेळगाव : शहर आणि परिसराला शनिवारी दुपारी पावसाने झोडपून काढले. तसेच पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असून गेल्या काही दिवसांपासून दररोज पाऊस पडत असल्याने नागरिकांची गर्मी पासून सुटका होत असली तरी शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढत असून पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून शहर व परिसरात दररोज कमी जास्त प्रमाणात पाऊस हजेरी लावत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. दररोज सकाळी कडक ऊन पडत असले तरी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाला सुरुवात होत आहे त्यामुळे शहरात खरेदीसाठी आलेल्या लोकांची तारांबळ उडत आहे. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास ढगांचा कडकडात आणि जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला पावसाचा जोर कमी होता मात्र काही वेळानंतर शहराच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

पावसाचा सर्वाधिक फटका फेरीवाले व रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्या पृथ्वीचा ना बसला असून भाजी व फळे भिजू नयेत यासाठी व्यापाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने शहरात येत आहेत त्यांनाही पावसाचा त्रास सहन करावा लागत असून पावसामुळे खरेदी वरील परिणाम होत असल्याची माहिती व्यापारी वर्गातून दिली जात आहे. तब्बल एक तासाहून अधिक वेळ पडलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून वाहनधारकांना या पाण्यातूनच ये जा करावी लागली आहे.

उद्यमबाग, टिळकवाडी, गोवावेस, शहापुर व शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाचा जोर अधिक होता. पावसासह जोराच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने काही भागात वीज पुरवठा वरील परिणाम झाला होता. शहराच्या काही भागातील गटारी स्वच्छ करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे गटारीतील कचरा रस्त्यावर वाहून आला आहे. तसेच पावसाला सुरवात झाल्यानंतर शहरातील अनेक रस्ते निर्मनुष्य झाले होते.

शहर आणि परिसरातील शेतकरी रब्बी हंगामात विविध प्रकारची पिके घेतात. तसेच वांगी, कोथिंबीर, मिरची, फ्लॉवर, कोबी, कलिंगड, काकडी आदी पिकांची लागवड केली जाते. मात्र सततच्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. तसेच येणाऱ्या दिवसात पावसाने उसंत न घेतल्यास भाजीपाला कुजून जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

शहरासह बेळगाव व खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून एक तासाहुन अधिक वेळ पडलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर पाणी साचून राहिले आहे. तर शिवारातील रस्त्यांवर चिखल निर्माण झाला आहे.

Web Title: Heavy Rains Lashed Belgaum City Citizens Suffer Water Logging Many Places

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..