चांदोली परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी

शिवाजी चौगुले 
Thursday, 6 August 2020

चांदोली परिसरात गेले तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने 24 तासात 140 मी.मी. पावसाची नोंद झाल्याने चांदोली परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली आहे.

शिराळा : चांदोली परिसरात गेले तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने 24 तासात 140 मी.मी. पावसाची नोंद झाल्याने चांदोली परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. 

मांगले-काखे पूल व कोकरूड-रेठरे, शिराळे खुर्द-माणगाव, मांगले-सावर्डे हे तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरणातून 950 क्‍युसेकने पाणी वारणा नदीत सोडले जात असल्याने वारणेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 

तीन दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सायंकाळी 4 वाजता धरणात पाणीसाठा 27.16 टी..एम.सी झाला असून धरण 78.93 टक्के भरले आहे.

धरणातून 950 क्‍युसेकने पाणी वारणा नदीत सोडले असल्याने वारणा नदीच्या पाणी पात्रता वाढ झाली असून अनेक ठिकाणी वारणेचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सर्वत्र पावसाची संततधार सुरू असल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे बळीराजा समाधानी आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains for second day in a row in Chandoli area