Bullock Cart Race : अबब... दोन बैलांची किंमत 1 कोटी 61 लाख रुपये; बैलगाडी शर्यतीच्या मैदानात 'हेलिकॉप्टर बैजा'चा धुरळा, आतापर्यंत 3 कोटींहून अधिक रुपयांची जिंकली बक्षिसे

Break Fail Baija Purchased for ₹61 Lakh in Athani : अथणीच्या बाळू हजारे यांनी ६१ लाख रुपयांना ‘ब्रेक फेल बैजा’ खरेदी केला. ‘हेलिकॉप्टर बैजा’सह दोन्ही बैलांची एकत्रित किंमत १ कोटी ६१ लाख रुपये झाली आहे.
Break Fail Baija Purchased for ₹61 Lakh in Athani

Break Fail Baija Purchased for ₹61 Lakh in Athani

esakal

Updated on: 

चिक्कोडी (जि. बेळगाव) : बैलगाडी शर्यतीच्या मैदानात ‘हेलिकॉप्टर बैजा’ उतरला की, प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावणार, अशी चर्चा सीमाभागातील बैलगाडी शर्यतप्रेमींमध्ये नेहमीच (Break Fail Baija bull price) रंगते. आपल्या वेगामुळे, ताकदीमुळे आणि मैदानात धुरळा उडविण्याच्या खास शैलीमुळे प्रसिद्ध झालेल्या या बैलाला आता त्याच्याच तोडीचा जोडीदार मिळाला आहे. अथणी तालुक्यातील शिरूर येथील शेतकरी बाळू हजारे यांनी तब्बल ६१ लाख रुपये मोजून ‘ब्रेक फेल बैजा’ नावाचा बैल खरेदी केला आहे. त्यामुळे या दोन्ही बैलांची एकत्रित किंमत एक कोटी ६१ लाख रुपये झाली आहे.

Loading content, please wait...