वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने महापुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार : मुख्यमंत्री

हेमंत पवार 
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

महापुरामुळे सांगली, कोल्हापुर, सातारा, कऱ्हाडसह महामार्गाची मोठी हानी झाली. पुरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. पावसाचे जागतिक रेकाॅर्ड तोडणारा पाऊस महाबळेश्वरमध्ये झाला. त्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी वर्ल्ड बँक आणि एशीयन डेव्लपमेंट बँकेच्या सहकार्याने ते जादाचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे महापुर आला तरीही त्याचा फटका बसणार नाही.'',अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

कऱ्हाड :''महापुरामुळे सांगली, कोल्हापुर, सातारा, कऱ्हाडसह महामार्गाची मोठी हानी झाली. पुरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. पावसाचे जागतिक रेकाॅर्ड तोडणारा पाऊस महाबळेश्वरमध्ये झाला. त्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी वर्ल्ड बँक आणि एशीयन डेव्लपमेंट बँकेच्या सहकार्याने ते जादाचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे महापुर आला तरीही त्याचा फटका बसणार नाही.'',अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री फडणवीस कऱ्हाड दौऱ्यावर असताने ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ''महापुराच्या पाण्याचे नियोजन करुन ते दुष्काळी भागाला देण्यासाठीचा दुरदृष्टीचा प्लॅन आम्ही हाती घेतला आहे. महापूर आल्यानंतर हानी होवू नये यासाठी वर्ल्ड बँकेने उपाययोजना केली आहे. नुकतीच वर्ल्ड बँक व एशीयन बँकेच्या 22 अधिकाऱ्यांचे पथक नुकतेच येऊन गेले. त्यांच्यासोबत आपत्ती व्यवस्थापन कसे करता येईल याचा आऱाखडा तयार करत आहोत. त्यासाठी वर्ल्ड बँक अर्थसहाय्य करणार आहे. पुराचे पाणी धरण व्यवस्थापातून थांबवण्यात येत नाही. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून जेवढे पाणी आले, त्यापेक्षा जास्त पाणी पाणलोट क्षेत्राच्या व्यतिरीक्त आले आहे. त्यासाठी महामार्गापासून गावातील रस्त्यापर्यंत, वीजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या गोष्टी प्रामुख्याने या आराखड्यात करण्यात येणार आहेत.''

''महापुराचे पाणी हे दुष्काळी भागाला देण्यासाठीचे नियोजन करण्याचे प्राथमिक मत वर्ल्ड बँकेच्या पथकाने मांडले आहे. त्याअंतर्गत लवादाच्या पाण्याव्यतीरीक्त आपत्ती व्यवस्थापातून हे जादाचे पाणी दुष्काली भागाला देण्यासाठीचा दुरदृष्टीचा प्लॅन आम्ही हाती घेतला आहे. त्यामुळे महापुरातील हानीची स्थिती निर्माण होणार नाही.'', असेही ते म्हणाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the help of the World Bank, the flood water will use for drought area