सांगलीतील 273 शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव पेंडिंग...का वाचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

सांगली ः शेतकऱ्यांचा अपघातात मृत्यू, अवयव निकामी झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना भरपाईतून मदत मिळावी म्हणून सरकारच्या कृषी विभागातर्फे हाती घेतलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून दोन वर्षांत जिल्ह्यातील 273 प्रकरणे विमा कंपन्यांकडे सादर केले आहेत. सर्वच प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. योजनेतून अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळते. लाभार्थी यंत्रणेचे उंबरठे झिजवत असून, पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले जात येत आहे. वर्षापूर्वी योजनेचा विस्तार करण्यात आला मात्र, मयतांच्या कुटुंबियांची फरफट सुरुच आहे. 

पूर्वीच्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेत बदल करत सन 2015 मध्ये तत्कालिन भाजप सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आणली. अपघातात मृत्यू पावल्यास अवयव निकामी झाल्यानंतर या योजनेतून कुटुंबीयांना एक ते दोन लाखांचा लाभ देण्यात येतो. एक वर्षापूर्वी या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. त्यामध्ये ज्यांच्या नावावर सात-बारा उतारा आहे. सबंधित शेतकऱ्यांसह कुटुंबातील एका व्यक्तिही त्यास पात्र ठरवण्यात आलेली आहे. त्या नात्यांमध्ये पती, पत्नी, मुले व आई-वडिल यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 

पालकमंत्री जयंत पाटील यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या प्रलंबीत प्रस्तावाबाबत दोन वेळा आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे. सदरची बाब अत्यंत चुकीची असून, शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास संबंधित गावच्या ग्रामसेवक व कृषी पर्यवेक्षकांनी संबंधितांच्या कुटुंबाकडून आवश्‍यक कागदपत्रांची तत्काळ पूर्तता करून घ्यावी. शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूचे क्‍लेम विमा कंपन्यांकडून विहीत मुदतीत संबंधित कुटुंबाला मिळवून द्यावे. यामध्ये कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी दिल्या होत्या. 

सन 2017-18, 2018-19 या दोन आर्थिक वर्षांत गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून भरपाई व मदतीसाठी एकूण 273 प्रस्ताव आले आहेत. मात्र विमा कंपनीचे नागपूर येथील कार्यालय केटेनमेंट भागात असल्यामुळे आमचे प्रस्ताव कुरियरमधून त्यांच्या कार्यालयात जाण्यातच काही दिवस अडचणी आहेत. काय मार्ग काढून तोडगा काढू. 
बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली 

अशी मिळते भरपाई... 
मृत्यू : दोन लाख रुपये 
दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी : दोन लाख रुपये 
एक डोळा किंवा एक अवयव निकामी : एक लाख रुपये 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hence 273 insurance proposals pending in Sangli; Why read it