"इथं' बनताहेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा 

दत्ता इंगळे
मंगळवार, 21 जानेवारी 2020

नगर तालुका : वाबळेवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथील "ओजस' धर्तीवर आपली शाळाही सर्वांगाने आंतरराष्ट्रीय दर्जाची, अत्याधुनिक बनविण्यासाठी नगर तालुक्‍यातील 98 शाळांनी पुढाकार घेतला आहे. 
तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या 234 शाळा आहेत. त्यात ग्रामीण भागातील 217 आणि उपनगरांमधील 17 शाळांचा समावेश आहे. त्यांपैकी 98 शाळांनी वाबळेवाडी शाळेच्या धर्तीवर आपल्या शाळा अत्याधुनिक बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी परिविक्षाधीन गटविकास अधिकारी अशिमा मित्तल यांनी पुढाकार घेतल्यामुळे तालुक्‍यातील शाळांचा सहभाग वाढत आहे. 

हेही वाचा ः बापूसमर्थकांचं ठरलं, राजूदादांचं पितळ उघडं पाडणार 

500जणांचा सहभाग 
या सर्व शाळांतील शिक्षक, पालक व सरपंच यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये एकूण 500 जण सहभागी झाले होते. तालुक्‍यातील शाळांमधील शिक्षक स्वतःहून वाबळेवाडीच्या शाळेच्या धर्तीवर शाळा बनविण्यासाठी आता पुढाकार घेत आहेत. "गटशिक्षणाधिकारी व विस्ताराधिकाऱ्यांशी संपर्क साधून आम्हीही शाळेत उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आम्हालाही वाबळेवाडी शाळेला भेट देण्याची परवानगी द्यावी,' अशी मागणी शिक्षकांनी केली. 

मॉडेल शाळेचा निश्‍चय 
या सर्व शाळांतील शिक्षकांसह त्यांच्या विद्यार्थ्यांचे पालक आणि सरपंचांनी वाबळेवाडीला भेट देऊन माहिती घेतल्यानंतर, आपलीही शाळा वाबळेवाडीसारखीच "मॉडेल' करण्याचा निश्‍चय सर्वांनी केला आहे. त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरवात झाली आहे. वाबळेवाडीच्या शाळेच्या धर्तीवरच आता अध्यापनाचे प्रयत्न शिक्षकांकडून केले जात आहेत. त्याला विद्यार्थ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. 

अशी आहे वाबळेवाडी शाळा 
शाळेच्या आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये "तेजस' आणि "ओजस' असे दोन प्रकार मान्यता पावले आहेत. त्यात वाबळेवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथील जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय "ओजस' शाळा आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव दिला जात आहे. विद्यार्थ्याच्या कलानुसार त्याला शिक्षण दिले जाते. या शाळेतील विद्यार्थी "टॅब'च्या आधारे शिक्षण घेत आहेत. सर्वच विद्यार्थी वाचन व गणिती क्रिया करतात. 

वाबळेवाडीला भेट देऊन पाहणी 
वाबळेवाडी शाळेला भेट देऊन पाहणी केली होती. या शाळेच्या धर्तीवर नगरमधील शाळा असाव्यात, अशी संकल्पना मनात आली. ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी नगर तालुक्‍यातील काही शाळांतील शिक्षकांना ती शाळा पाहण्यासाठी नेले. हा नगर तालुक्‍यापुरता सुरू केलेला उपक्रम आता जिल्हाभर राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी पुढाकार घेतला आहे, असे परिविक्षाधीन गटविकास अधिकारी अशिमा मित्तल यांनी सांगितले.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Here are becoming international quality schools.