येथे.. पिवळ्या ठिपक्‍या  कवड्या सापाचे अस्तित्व 

SLA20A03097_pr.jpg
SLA20A03097_pr.jpg
Updated on

शिराळा (सांगली) : शिराळा येथे पिवळ्या ठिपक्‍याच्या कवड्या सापाचे अस्तित्व आढळून आले असून सदरचा साप हा बिनविषारी आहे. मात्र हा साप मृतावस्थेत सापडला आहे. बिनविषारी असलेला हा साप देशात फार कमी ठिकाणी आढळतो. सर्वसाधारणपणे यापूर्वी मध्य भारत , उत्तर -पश्‍चिम घाट, मध्य पश्‍चिम भारत या भागामध्ये या सापाची नोंद करण्यात आली आहे. 

त्यामध्ये महाराष्ट्रातील पश्‍चिम घाट जवळील काही भागात तसेच नाशिक, पुणे, मुळशी, तळेगाव, सांगली, बुलढाणा तसेच गुजरातमधील काही भागात आढळल्याचे प्रसिद्ध शोधनिबंधावरून समजते. काळ्या शरीरावर ठळक पिवळे ठीपके व त्याला लागूनच असलेल्या समांतर रेषा, तोंडा जवळील ओठा कडचा आणि पोटाकडचा भाग पांढरा रंगाचा दिसून येतो. बऱ्याच वेळा हा साप मण्यार म्हणून नागरिकांकडून मारला जातो.

त्यामुळे या सापाची संख्या फार कमी प्रमाणात शिल्लक राहिली आहे. पूर्ण वाढ झालेल्या या सापाची लांबी एक ते दीड फुटापर्यंत असते. हे साप साधारणतः रात्रीच्या वेळी बाहेर पडतात आणि पाली, सापसुरळी इत्यादी वर आपली गुजराण करतात.

शिराळा मध्ये हा साप प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनचे सर्प अभ्यासक प्रणव महाजन आणि त्यांचे सहकारी यांनी नोंदवला आहे. या सापाची नोंद महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ च्या शिराळा विभागच्या लोक जैवविविधता नोंदवहीमध्ये केली जाणार आहे. 

दुमिळ साप तो ही मृतावस्थेत 
शिराळा येथे हा साप सापडला तेव्हा मृत अवस्थेत होता. त्यामुळे या सापाची पहिली नोंद ही मृत अवस्थेत झाली आहे. 
प्रणव महाजन (प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनचे सर्प अभ्यासक) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com