Here saranjam Estate Land
sakal
चंदगड - तालुक्यातील हेरे सरंजाम अंतर्गत वर्ग दोनच्या जमिनी संबंधित कुळांच्या नावे करण्याबाबत राज्य शासनाने नवीन अध्यादेश काढला आहे. कृषी दिनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आज यासंदर्भातील घोषणा केली. त्यानुसार कोणतीही कागदपत्रे दाखल न करता सद्यस्थितीत वर्ग दोनची जमीन जशीच्या तशी वर्ग एक म्हणजे शेतकऱ्याच्या नावावर होणार आहे.