सांगली- येथील कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे आज नविन खपली शेतीमाल सौदयाचा प्रारंभ व्यापारी प्रतिनिधी संचालक मुजीर जांभळीकर यांच्याहस्ते करण्यात आला. मुहूर्ताच्या सौद्यात खपलीला क्विंटलला 7 हजार रूपये इतका उच्चांकी दर मिळाला.

नविन खपली सौद्याचा प्रारंभ मे. आण्णाप्पा हालुंडे व आप्पासो दादा पाटील या दुकानातून झाला. नविन खपली सौद्यामध्ये शेतकरी सुभाष चौगुले (रा. चिक्कोडी ता.रायबाग) व पिंटू बेल्लद (रा.बागेवाडी ता. हक्केरी) यांच्या खपलीला क्विंटलला सात हजार रूपये इतका जास्तीत जास्त दर मिळाला. सदरची खपली महादेव माने, रेणूका इंडस्ट्रीज, राहूल पाटील, अनिल पाटील, योगेश दडगे, आर. टी. कुंभार यांनी खरेदी केली आहे. नविन खपली सौद्यात क्विंटलला कमीत कमी 6 हजार 500 रूपये आणि जास्तीत जास्त 7 हजार रूपये इतका दर मिळाला आहे.
सौद्यासाठी व्यापारी प्रतिनिधी संचालक शितल पाटील, श्री. जांभळीकर, आडते/व्यापारी प्रमोद चौगुले, सिध्दू दलाल, लक्ष्मण दलाल, महेश झंवर, उमेश कुंभार, बंडू दलाल, बाजार समितीचे प्रभारी सचिव आर. ए. पाटील तसेच अडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार व शेतकरी उपस्थित होते. दरम्यान खपली उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त खपली बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन यावे. तसेच शेतकऱ्यांसाठी चालू असणाऱ्या शासनाच्या हळद /बेदाणा शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती दिनकर पाटील व सचिव श्री. पाटील यांनी केले आहे.