तासगाव शहरात सर्वाधिक विक्रमी 40, तालुक्‍यात 75 बाधित 

रविंद्र माने 
Wednesday, 16 September 2020

कोरोना रुग्णाच्या संख्येत रोज भरच पडत आहे. तासगाव तालुक्‍यातील कोरोना रगणांची संख्या आज 1387 वर पोहोचली आहे.

तासगाव : तालुक्‍यात कोरोना रुग्णाच्या संख्येत रोज भरच पडत आहे. तासगाव तालुक्‍यातील कोरोना रगणांची संख्या आज 1387 वर पोहोचली आहे. आज तालुक्‍यात 75 कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यापैकी तासगाव शहरात विक्रमी 40 कोरोना रुग्ण सापडल्याने शहर हादरले आहे. कोरोना रुग्ण वाढत असताना प्रशासन कुठे आहे? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. आतापर्यंत 83 मृत्यू झाले आहेत. 

तासगाव शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्‍यात येताना दिसत नाही. आज शहरात विक्रमी असे 40 रुग्ण सापडले. तालुक्‍यात तासगाव शहर हॉटस्पॉट बनले असून त्याचा परिणाम दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. तासगाव शहर सद्या कोरोना हॉटस्पॉट बनू पहात आहे. आज रुगणांची संख्या 40 असली तरी गेल्या 24 तासात एकही मृत्यू झाला नाही.

एवढाच दिलासा मिळाला. नगरपालिका कोरोनामुळे कंटेन्मेंट झोन करण्या पलीकडे काही करताना दिसत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पालिकेने सुरू केलेली वैद्यकीय सेंटर सगळे डॉक्‍टर कोविड सेंटर वर अडकल्याने बंद पडले आहेत. तालुका आणि पालिका प्रशासन कोरोना बाबत करते काय? हा सवाल विचारला जात आहे. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्‍यकता आहे. 

ग्रामीण भागातील रूग्ण 
प्रमाणावर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दररोज रुग्ण सापडत असल्याने नागरिक अक्षरशः हादरले आहेत. आज वासुंबे येथे 6,तुरची 7 सावळज 5, कवठेएकंद 3, विजयनगर मांजर्डे चिंचणी प्रत्येकी 2, बस्तवडे गव्हाण कुमठे मनेराजुरी, नेहरूनगर पुनदी उपळावी येळावी येथे प्रत्येकी 1 कोरोना रुग्ण सापडला आहे. तालुक्‍यात आज 75 रुग्ण सापडले तर 46 कोरोनामुक्त झाले. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The highest number of 40 was recorded in Tasgaon