तुंग-कसबेडिग्रज दरम्यानचा महामार्ग ठरतोय जीवघेणा

बाळासाहेब गणे 
Saturday, 29 August 2020

सांगली इस्लामपूर या राज्यामार्गावरील तुंग ते कसबेडिग्रज दरम्यानचा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यामुळे जीवघेणा ठरत आहे.

तुंग : सांगली इस्लामपूर या राज्यामार्गावरील तुंग ते कसबेडिग्रज दरम्यानचा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यामुळे जीवघेणा ठरत आहे. राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा सांगली- पेठ हा राज्यमार्ग ठेकेदारांच्या ठिगळांच्या कामामुळे नेहमी चर्चेत आसतो. हा राज्यमार्ग नेहामी रहदारीचा मानला जातो. सांगली पेठ मार्गे पुणे, मुंबई साठी व ग्रामिण भागात जाण्यासाठी याचा वापर होतो. 

रस्ता चौपदरीकरणावेळी सोलापूरच्या आवताडे कन्स्ट्रक्‍शनकडे या रस्त्याचे काम होते. 9 कोटी खर्च करुन हा रस्ता बनवला पण रस्तावरील पाणी वाहुन जाण्याऐवजी पहिल्याच पावसात रस्ता वाहुन गेला. राज्यामार्गाची ही आवस्था व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष यामुळे सामाजिक संघटनाना अंदोलन करावे लागले. 

तुंग सुधार समितीने अक्षरशः रस्त्याचे व बांधकाम विभागाचे श्राद्ध घातले. यामुळे तत्कालीन कृषीमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी तुंग ते कसबेडिग्रज रस्त्ता दुरुस्तीसाठी चार कोटी मंजुर करुन लक्ष्मीफाटा येथे उदघाटन केले. कोल्हापूरच्या निर्माण कन्स्ट्रक्‍शन दोन वर्षापूर्वी या रस्त्याचे काम केले. पण दोन वर्षातच या रस्त्यावर कसबे डिग्रज नजीक मध्यभागी मोठ मोठे खड्डे पडले. सध्या हे खड्डे हे अपघातास आमंत्रण देत आहेत. दिवसा प्रवास करताना खड्डे चुकवावे लागतात. तर रात्रीचा प्रवास जीवघेणा ठरत आहे.

रात्रीच्यावेळी तर खड्डे दिसणे मुश्‍किल होत आहे. दोन दिवसापूर्वी मिणचे मळा येथे खड्ड्यांमुळे मोठा अपघात घडला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या खड्ड्यांमुळे रोज अनेक छोटे मोठे अपघात होताना दिसत आहेत.इतके होऊनही हे खड्डे मुजवण्याची कोणतीही काळजी घेतली नाही. बांधकाम विभागाने या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे. सदर रस्त्यावरील खड्डे तात्काळ मुजवून घ्यावेत अशी मागणी कसबे डिग्रज, तुंगसह या मार्गाशेजारील गावांमधील नागरिकांच्यातुन होत आहे. 

सांगली पेठ हा मुख्य राज्यमार्ग आहे. कसबे डिग्रजजवळील मोठमोठे खड्डे तात्काळ मुजवुन घेऊन रस्ता वाहतुकयोग्य बनवावा. अन्यथा बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर अंदोलन करु 
पै.विशाल चौगुले, जिल्हा परिषद सदस्य कसबेडिग्रज 

कसबेडिग्रज तुंग दरम्यानचा रस्ता दुरुस्त होण्यासाठी पालकमंत्री व या मतदार संघाचे आमदार जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरवा करणार आहे. तसेच यासंबंधी निवेदन देणार आहे. 
भास्कर पाटील तुंग, राष्ट्रवादी का×ग्रेस जिल्हा उपाध्यक्ष 

सांगली इस्लामपूर हा मुख्य राज्यमार्ग आहे. आम्ही कृती समितीद्वारे अंदोलन केले तेव्हा याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला पण ठेकेदारांनी काम मात्र गल्लीतल्या रस्त्यासारखे केले आहे. राष्ट्रीय महामार्ग फलक फक्त नावालाचआहे. रस्त्यावरील मोठमोठया खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. बांधकाम विभागाने तात्काळ खड्डे मुजवावेत अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू, सतिश साखळकर, सांगली पेठ कृतीसमिती सदस्य 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The highway between Tung-Kasbedigraj is fatal