सांगली :‘‘ राज्यात ‘लव्ह जिहाद’, धर्मांतराच्या विरोधात कायदा करायचा असेल, गड- किल्ल्यावरील अतिक्रमण उद्ध्वस्त करायचे असतील तर ‘हिंदू एकता आंदोलन’सारख्या आक्रमक संघटनेची हिंदूंना गरज आहे. .हिंदूंनी राज्यातील गावागावांत ‘हिंदू एकता आंदोलन’च्या शाखा काढाव्यात,’’ असे प्रतिपादन नरवीर शिवा काशिद यांचे थेट तेरावे वंशज आनंदराव काशीद यांनी केले. हिंदू एकता आंदोलन, गावभाग विभागाच्या तक्रार निवारण केंद्र कार्यालयाचे उद्घाटन व बोर्डाचे अनावरण नरवीर शिवा काशीद यांचे थेट तेरावे वंशज आनंदराव काशीद यांच्या हस्ते व ‘हिंदू एकता आंदोलन’चे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाले..Sangli RTO : वाहनधारकांना नाही शिस्त; ‘आरटीओ’ची वसुलीवर भिस्त; गतवर्षी २५ हजार कारवाया; ५ कोटी रुपयांची दंड वसुली.छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हिंदू एकता आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, ‘‘पाकिस्तानला मदत करणाऱ्या अमेरिकेच्या वकालतीवर बॉम्ब टाकणारी ‘हिंदू एकता आंदोलन’ ही आक्रमक संघटना आहे. देशातल्या व देशाबाहेरच्या हिंदूंचे रक्षण करण्यासाठी ‘हिंदू एकता आंदोलन’च्या भगवा झेंड्याखाली एकत्र या.’’.हिंदू एकता आंदोलन’चे गावभाग विभाग अध्यक्ष गजानन माने यांनी स्वागत केले. सांगली शहर उपाध्यक्ष अनिरुद्ध कुंभार यांनी आभार मानले. दीपक केळकर महाराज, प्रदीप निकम, राजू जाधव, रवींद्र सावंत, अवधूत जाधव, हरप्रित सिंग, सूरज आडिसरे, सुमित शिंगे, आनंदराव चव्हाण, तानाजी फडतरे, गणेश पवार, अनिल मांगले, राजू पवार, उत्तम लोखंडे, प्रशांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते..Sangli Crypto Fraud : 'बंटी-बबली' अखेर जेरबंद! 4 वर्षे पोलिसांना हुलकावणी देणारं जोडपं गोव्यातून कसं पकडलं? सांगलीतील प्रसिद्ध डॉक्टर पती-पत्नीचा काळा कारनामा उघड!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.