Ichalkaranji News : हिंदूराव शेळकेंच्या शरद पवार भेटीने इचलकरंजीतील राजकारणांत खळबळ

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी आज सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे इचलकरंजीतील राजकारणांत खळबळ उडाली आहे.
Hindurao Shelake
Hindurao Shelakesakal
Updated on

इचलकरंजी - भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी आज सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे इचलकरंजीतील राजकारणांत खळबळ उडाली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांचे ते निकटचे सहकारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात परिचीत आहेत.

आमदार प्रकाश आवाडे यांच्या विरोधातही त्यांनी प्रदिर्घ काळ इचलकरंजीत राजकारण केले आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या पवार यांच्या भेटीमागे अनेक तर्क - वितर्क करण्यात येत आहेत. इचलकरंजी विधान सभा मतदार संघातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत चर्चेला सुरवात झाली आहे.

इचलकरंजीतील राजकारणात शेळके यांची स्वतंत्र अशी ओळख आहे. ते माजी नगराध्यक्ष आहेत. सुरुवातीच्या काळात ते खासदार माने गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. कालांतरांने ते भाजपमध्ये दाखल झाले. फडणवीस शासनाच्या काळात त्यांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपदावर काम केले आहे.

भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावर त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे. त्यामुळेच त्यांना आमदार आवाडे यांच्या विरोधात विधान सभेला भाजपने उमेदवारी दिली होती. पण छाननीत त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला होता.

सध्या तोडांवर विधान सभा निवडणूक आली आहे. कोणत्याची क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येत आहे. आमदार आवाडे यांनी कांही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे इचलकरंजी भाजपमध्ये त्यांच्या विरोधात काम करणा-यांची कोंडी झाली आहे.

त्यामुळे सध्या अस्वस्थ असलेल्या दुस-या फळीतील नेत्यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आज शेळके यांनी सांगली येथे पवार यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे वृत्त पसरताच शहरातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आठवड्याभरातील ही दुसरी मोठी राजकीय घडामोड आहे. या घडामोडीकडे विशेषतः महाविकास आघाडीचे लक्ष लागून राहिले होते.

सध्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदन कारंडे यांची उमेदवारी निश्चीत समजली जात आहे. त्यानुसार त्यांनी प्रचाराचा आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यातच शेळके - पवार भेटीने शहरातील राजकारणाची दिशाच बदलण्याची शक्यता आहे.

पक्षप्रवेशवर अथवा संभाव्य उमेदवारीवर पवार यांच्याशी कोणतीच चर्चा झाली नसल्याची माहिती शेळके यांनी `सकाळ`शी बोलतांना दिली आहे. आपणास भेटण्यास दोनवेळा निरोप आला होता. त्यामुळे आपण त्यांची भेट घेतली असून राजकारणांवर कोणतीच चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com