Hirkani Kada Raigad climbed 22 women
Hirkani Kada Raigad climbed 22 women sakal

२२ महिलांनी केला रायगडवरील हिरकणी कडा सर

महिला दिनी अनोखा उपक्रम, सांगलीच्या अपंग काजलचा सहभाग

तुंग : दरवर्षी ८मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आसतो. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रती आदर व्यक्त करतात. परंतु फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या सांगली, सातारा, कराड, पुणे, मुंबई,खारघर,पनवेल येथील २२ महिलांनी एकत्र आल्या.अन् महिलादिनाचे औचित्य साधत रायगडवरील हिरकणी कडा सर केला. त्यांच्या या जिद्दीला मुंबईच्या शिलेदार एडव्हेंचर या ग्रुपची मोलाची साथ मिळाली. यामध्ये सांगलीची अपंग मुलगी काजल कांबळे हिचाही समावेश आहे. यापूर्वीही तिने ठाणे येथील वजीर सुळका सर केला आहे. पायात अपंग आसतानाही तीने हे आव्हान पेलले.

“जिथून फक्त पाणी खाली जाऊ शकते आणि वारा वर येऊ शकतो”, असं वर्णन रायगडावरील हिरणीकड्याचं करण्यात आलं आहे. रायगडावर दुध दही विकण्यासाठी आलेली हिरकणी सुर्यास्तानतंर रायगडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे, आपले बाळ घरी एकटे असेल, भुकेले असेल या विचाराने व्याकुळ होऊन रायगडचा अवघड असा कडा ऊतरुन गडाखाली येते. हि गोष्ट जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजते तेव्हा राजे त्या हिरा गवळणीला गडावर बोलावून सन्मान करतात व तो कडा तासुन तिथे बुरुज बांधून त्याला हिरकणी बुरुज हे नाव देतात. इतिहासात घडलेली ती हिरा गवळणीची गोष्ट आजही कित्येक महिलांना प्रेरणादायी आहे.

महिला दिनाचे औचित्य साधत ६ मार्च रोजी शिलेदार ऍडव्हेंचर इंडिया संस्थेच्या वतीने महिलांसाठी रायगडावरील रौद्रभिषण हिरकणी कडा आरोहण मोहिमेचे आयोजन केले. मोहिमेत काही महिला सदस्या पारंपारिक पोशाख परिधान करुन सहभागी झाल्या होत्या.या मोहिमेत दिव्यांग काजल कांबळे (सांगली), अभया गायकवाड(पुणे), पल्लवी चाळके (पुणे), कोमल फल्ले (कराड), यशश्री भटकांडे (पुणे), गीता कुलकर्णी (पुणे), अनुप्रीता कुलकर्णी (पुणे), प्रांजल शहापूरकर (पुणे), राजश्री पाटील (सातारा), शीतल पवार (पुणे), प्रीती कदम (मुंबई), श्रद्धा भांगे (मुंबई), सुवर्णा सातपुते (मुंबई), सोनाली हतांकर (मुंबई), प्रियांका पस्ते (खारघर), श्वेता गुजर (खारघर), स्मिता पेडणेकर (पनवेल) या विविध क्षेत्रात काम करणा-या महिला सहभागी झाल्या होत्या. एक अगळावेगळा महिला दिन साजरा केल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसले.

या मोहिमेचे नेतृत्व 'शिलेदार संस्थेचे' प्रमुख सागर नलवडे यांनी केले. प्रदीप मदने, अंकुश वाघमारे, अंकुर कुंभार, रजनीकांत जाधवस्वप्नील चव्हाण, चेतन निखार्गे, प्रथमेश नगाप यांचे तांत्रिक सहाय्य लाभले.

रायगड हिरकणी कडा सर करुन सहभागी महिलांचा सन्मान करत महिलांप्रती आदर व्यक्त करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. तो यशस्वी झाला.

- सागर नलवडे 'शिलेदार संस्था' प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com