पांढरपाणी येथे शिवकालीन विहीर भागवतेय तहान

अमर पाटील
मंगळवार, 7 मे 2019

छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरुन विशाळगडाकडे जात असताना या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले असता एका चाचे अज्जीने महाराजांना भाजी-भाकरी  खाऊ घातली. त्यावर महाराजांनी चाचे आज्जीला काय हवे? असे विचारले असता. चाचे आज्जीने माझ्या गावाला पिण्यासाठी पाणी नाही. राजे माझ्या गावासाठी विहीर द्या, असे सांगितले. तेव्हा महाराजांनी ही विहिरी खोदून दिली.

बांबवडे - शिवकालीन विहिरीत आजही असलेला उत्तम पाण्याचा स्रोत म्हणजे शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना! पांढरपाणी (ता. शाहूवाडी) येथील शिवकालीन विहीर आजही पिण्याच्या पाण्याकरिता गावासाठी वरदान ठरत आहे. जीर्ण झालेल्या या विहिरीचे संवर्धन होण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे.

पांढरपाणी हे गाव इतिहासात चौकीवाडी म्हणून ओळखले जायचे. त्याठिकाणी पांढऱ्या रंगाचे पाणी वाहणारा ओढा असल्याने त्या ठिकणावरुन त्यास ‘पांढरपाणी’ असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी घोड्यांना पाणी पाहण्याचे ठिकाण ठरविले होते. त्यासाठी याठिकाणी मोठा तलाव बांधला होता. त्या तलाव्यातील पाण्यावर याठिकाणी मोठी पहारा देणारी चौकी होती. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरुन विशाळगडाकडे जात असताना या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले असता एका चाचे अज्जीने महाराजांना भाजी-भाकरी  खाऊ घातली. त्यावर महाराजांनी चाचे आज्जीला काय हवे? असे विचारले असता. चाचे आज्जीने माझ्या गावाला पिण्यासाठी पाणी नाही. राजे माझ्या गावासाठी विहीर द्या, असे सांगितले. तेव्हा महाराजांनी ही विहिरी खोदून दिली. आजहीही विहिरी शिवाजी महाराजांची विहीर म्हणून ओळखली जाते. अशी मौखिक दंत कथा येथील वयोवृद्ध सांगतात. पन्हाळगड ते पावनखिंड यादरम्यान पायवाटेने चालत जातात विहीर पाहावयास मिळते.

त्या काळातील भूगर्भातील पाणी शोधण्याचे तंत्र, साडेतीनशे वर्षापूर्वी सापडलेला पाण्याचा उगम हा त्यानंतर कित्येक नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षित आहे. परंतु आज साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेल्या या विहीरीचे अवशेष मात्र जीर्ण झाले आहेत.
इतिहासकालीन असे काही अवशेष सापडले आहेत पण  त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. त्याचे दाखले व पुरावे या अभावी त्यांचे संवर्धन झाले नाही. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या विशाळगडावरील लिहिलेल्या पुस्तकात या विहिरीचा उल्लेख आहे.

परंतु या मौखिक पुराव्यावर अजून बऱ्याच इतिहासकालीन वास्तू आहेत. परंतु त्यांना कागदोपत्री पुरावे नसल्यामुळे पुरातत्त्व विभागाकडे त्यांचे संवर्धन झाले नाही. ही विहिरही त्याचाच एक भाग आहे. या विहिरीचा शोध अलिकडील काही वर्षात लागला आहे. त्यामुळे त्या विहिरीचे पुरातत्त्व विभागाकडे संवर्धन करण्याची जबाबदारी नाही. परंतु लोक सहभागातून या वास्तूचे संवर्धन व्हावे असे गावकऱ्यांना वाटते. 

अनेक इतिहासकालीन वास्तूंचे व ठिकाणांचे कागदोपत्री पुरावे मिळालेले नाहीत. या विहिरीची बांधकामशैली जुनीच आहे. मौखिकरीत्या या कथा जरी असल्या तरी इतिहासाच्या वारसास्थळांचे जतन व्हावे. 
- इंद्रजित सावंत, इतिहास अभ्यासक.

शिवाजी महाराजांनी बांधलेल्या या वििहरीचे जतन झाले पाहिजे यासाठी आम्ही नेते मंडळींकडे पाठपुरावा केला. पण कोणीच लक्ष घातले नाही. तरी या विहिरीचे जतन व्हावी ही अपेक्षा आहे. 
- शामराव कासार, ज्येष्ठ नागरिक, पांढरपाणी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Historic well built by Raje Shivaji in Pandharpani