
सांगली : नांद्रे (ता. मिरज) येथील रस्त्यावरून पायी निघालेल्या संजय बापू सुरपुसे (वय ५०, चौगुले गल्ली, नांद्रे) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. मृत संजय यांचे बंधू महावीर सुरपुसे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.