पुणे, सांगली, कोल्हापुरातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

कोल्हापुरातील काही भागात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

पुणे : राज्यभरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. तसेच आता कोल्हापुर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना मुसळधार पावसामुळे उद्या (गुरुवार) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

कोल्हापुरातील काही भागात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

तसेच पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांसह सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळा-महाविद्यालयांनाही प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Holidays to schools colleges in Pune Sangli Kolhapur due to Heavy Rain