होम आयसोलेशन रुग्णांना वाळीत टाकू नये : जिल्हाधिकारी डॉ. चौधरी

बलराज पवार
Sunday, 26 July 2020

सांगली-  कोरोनाची लक्षणे नसलेले किंवा अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोरोना केअर सेंटरऐवजी होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. मात्र या रुग्णांना वाळीत टाकणे, वेगळी वागणूक देणे असे प्रकार करु नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज केले.

सांगली-  कोरोनाची लक्षणे नसलेले किंवा अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोरोना केअर सेंटरऐवजी होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. मात्र या रुग्णांना वाळीत टाकणे, वेगळी वागणूक देणे असे प्रकार करु नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज केले.

होम आयसोलेशनचे निकष आणि नियमावलीची माहिती जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले, होम आयसोलेशनसाठी सदर रुग्णाचे घर स्वतंत्र असावे. यामध्ये किमान दोन स्वतंत्र खोल्या त्याला जोडूनच बाथरुमची सोय असावी असे निकष आहे. जेणेकरुन असे रुग्ण घरी राहिले तरी त्यांचा घरच्यांशीही संपर्क येणार नाही. या रुग्णांची काळजी घेण्यासाठी गंभीर आजार नसणारा एक काळजीवाहक असावा. असे रुग्ण होम आयसोलेशनसाठी पात्र ठरवण्याचे अधिकार वैद्यकीय अधिकाऱ्यांना आहेत. 

होम आयसोलेशन (गृह विलगीकरण) असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी अथवा वैद्यकीय अधिकारी हे दररोज भेट देवून चौकशी करतील. या रूग्णांना तिसऱ्या, सातव्या व दहाव्या दिवशी वैद्यकीय अधिकारी प्राधान्याने भेट देतील. या रूग्णांस काही त्रास झाल्यास त्यांना डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल येथे संदर्भित करण्यात येईल. 
या रुग्णांना त्यांच्या शेजाऱ्यांनी वेगळी वागणूक देणे, त्यांना वाळीत टाकणे असे प्रकार करु नयेत. उलट त्यांना घराबाहेर पडू नये यासाठी मदत करावी. त्यांना ग्रामदक्षता समिती, वॉर्ड समिती मदत करतील, असे ते म्हणाले. 

हे रुग्ण पात्र नाहीत 
60 वर्षांवरील गंभीर आजार असणाऱ्या आणि कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांना कोरोना केअर सेंटरमध्येच ठेवण्यात येणार आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, हृदयविकार, श्‍वसनाचे विकार, अस्थमा आदी कोमॉर्बिडीटी झालेल्या रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. अशा व्यक्ती तसेच ज्या रूग्णांच्या घरी गृह विलगीकरणाकरिता स्वतंत्र दोन खोल्या त्याला जोडून शौचालय उपलब्ध नाही, तसेच ज्यांच्या घरात गंभीर आजार नसणारी काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध नाही अशा व्यक्ती गृह विलगीकरणसाठी अपात्र असतील त्यांना कोवीड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Isolation Patients should not be treated differently: Collector Dr. Chaudhary