व्हिडिओ ः गृहमंत्री देशमुख म्हणतात, मरकजला गेलेल्या १५६ परदेशी पर्यटकांवर कठोर कारवाई

Home Minister Deshmukh said, strict action against those foreign nationals
Home Minister Deshmukh said, strict action against those foreign nationals
Updated on

नगर - जिल्ह्यातील कोरोनाची संख्या अठ्ठावीसवर गेली आहे. परदेशी नागरिक टुरिस्ट व्हिसा घेऊन आले होते. मात्र, दिल्लीतील मरकज या कार्यक्रमास उपस्थित राहिले. त्यांच्यामुळे नगरमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ झाली.

नगरमध्ये २९ तर महाराष्ट्रात १५६जणांनी व्हिसाचा गैरवापर गेला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. नगरमध्ये सापडलेल्या लोकांना न्यायालयाने आज कोठडी दिली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देशमुख यांनी नगरमध्ये येऊन आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. गृहमंत्री देशमुख म्हणाले की, राज्यात तसेच जिल्ह्यात रूग्णांची संख्या मोठी असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. सरकारी साखर कारखाने, जिल्हा परिषद यांच्यासह खासगी हॉस्पिटल्सने बेड उपलब्ध करून दिले आहेत. व्हेंटिलेटरची संख्याही मोठी आहे. मात्र, त्याची गरज पडणार नाही. कारण जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच चांगल्या प्रकारे काम करीत आहेत.

नगरमध्ये एकूण २७ रूग्ण होते. त्यातील दोन महिला होत्या. नगर शहर, जामखेड, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव नेवासा, राहाता येथे हे रूग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरू आहेत. ज्या परदेशी नागरिकांनी व्हिसा कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यांच्यावर पोलिस अधिकारी तपास करून कारवाई करतील. कायद्यातही त्यांच्यावर कठोर शिक्षेची तरतूद आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com