होम क्वारंनटाईन संख्या वीसवरुन चौदावर 

संतोष कणसे
गुरुवार, 26 मार्च 2020

कडेगाव : तालुक्‍यात होम क्वारंनटाईनची संख्या 20 वरुन 14 अशी कमी झाली आहे.त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी भीतीचे वातावरण कायम आहे.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभाग व तालुका प्रशासन 

कडेगाव : तालुक्‍यात होम क्वारंनटाईनची संख्या 20 वरुन 14 अशी कमी झाली आहे.त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी भीतीचे वातावरण कायम आहे.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभाग व तालुका प्रशासन 

होम क्वारंनटाईन व बाहेर गावाहून आलेल्या लोकांवर नजर ठेवून आहे, अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. अशोकराव वायदंडे यांनी "सकाळ'शी बोलतांना दिली. 
तालुक्‍यात परदेशी वारी करुन एकूण 16 लोक आले होते.तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशीवारी करुन आलेल्या लोकांनी स्वतःहून आपली नावे आरोग्य विभागाला कळवावी असे आवाहन आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाने केले होते.परंतु 

परदेशवारी करुन आलेल्या 16 पैंकी फक्त एका व्यक्तीने स्वतः हून आपण परदेशातून आल्याचे सांगितले तर अन्य 15 परदेशीवारी करुन आलेल्यांचा शोध आरोग्य विभागाने घेतला आहे.यांच्या घरी अनेकदा जावूनही आपण परदेशवारी केली नसल्याचे ते आरोग्य विभागाला सांगत नव्हते.परंतु आरोग्य विभागाने तालुकाभर फिरुन परदेशवारी करुन आलेल्यांची माहिती संकलीत केली.अन त्यांना सोळा जणांना होम क्वारंटाईन केले.तर काल (ता.25) बुधवारी सायंकाळी त्यामध्ये पुन्हा 4 जणांची भर पडली आहे. 

तर एकूण 20 पैकी 6 होम क्वारंटाईनचा चौदा दिवसांचा कालावधी संपला आहे.त्यामुळे आताच्या घडीला तालुक्‍यातील होम क्वारंटाईनची संख्या 14 वर पोहोचली आहे. 
काल नव्याने होम क्वारंटाईन झालेल्या चार व्यक्ती कडेगाव शहरांतील असल्याने शहरात चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर आरोग्य विभागाने या सर्व होम क्वारंटाईनची आरोग्य विभागाकडून दिवसातून तीन वेळा आरोग्य तपासणी सुरु केली आहे. 

परगावाहून आलेल्या 5 हजार 190 जणांना नोटीस 
नोकरी व गलई व्यवसायानिमित्त पुणे,मुंबईसह देशभरात विखुरलेले असे परगावाहून तालुक्‍यात आलेल्या लोकांची संख्या आता 5 हजार 190 वर पोहोचली आहे.त्यामुळे त्यांनाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जावू नये,बाहेर फिरू नये अशी आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. 

 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home quarantine number reduction