राहुरीत आले ११२७ पाहुणे...हातावर मारला होम क्वॉरंटाईनचा शिक्का, फिरले तर सांगा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये. यासाठी, बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या सर्व नागरिकांच्या हातावर 'होम क्वारंटाईन' शिक्का मारला जाईल. त्यांनी चौदा दिवस घरात बसावे. बाहेर फिरू नये. अशी सक्त ताकीद दिलेली आहे.

राहुरी ः "राहुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये पाहुणे म्हणून बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या तब्बल ११२७ जणांची नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली. या सर्वांची प्रकृती चांगली आहे. तरी, त्यांच्या हातावर 'होम क्वारंटाईन' शिक्के मारले जातील. असे लोक बाहेर फिरतांना आढळले. तर नागरिकांनी त्यांना मज्जाव करावा. त्यांची नावे कळवावी. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल." असे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी सांगितले.
    शेख म्हणाले, "कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. परंतु, त्यापूर्वी तालुक्यातील ग्रामीण भागात बाहेरच्या जिल्ह्यातून अनेक जण आले आहेत. पुणे, मुंबई, ठाणे, औरंगाबाद व इतर शहरांमध्ये कामानिमित्त स्थायिक झालेले व मूळचे राहुरी तालुक्यातील असलेले नागरिक तसेच पाहुणे म्हणून बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले नागरिक मोठ्या संख्येने आले आहेत. त्यांची नावे ग्रामसेवकांतर्फे रजिस्टर मध्ये नोंद करुन, त्यांच्या तब्येतीची नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली आहे. ११२७ जणांची आतापर्यंत तपासणी झाली आहे. त्या सर्वांची तब्येत चांगली आहे. त्यांना कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे नाहीत. असे वैद्यकीय अधिकारी यांनी कळविले आहे.

त्यांच्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये. यासाठी, बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या सर्व नागरिकांच्या हातावर 'होम क्वारंटाईन' शिक्का मारला जाईल. त्यांनी चौदा दिवस घरात बसावे. बाहेर फिरू नये. अशी सक्त ताकीद दिलेली आहे.

सौजन्याने वागा पण गावभर फिरू नका

ज्या गावात बाहेरच्या जिल्ह्यातील पाहुणे आले. त्या गावातील नागरिकांनी पाहुण्यांशी सौजन्याने वागावे. शेजारी-पाजारी राहणाऱ्या लोकांनी त्यांना माणुसकीने समजून घ्यावे. परंतु, बाहेरच्या पाहुण्यांनी 'होम क्वारंटाईन' शिक्का घेऊन गावभर फिरू नये. तसे आढळल्यास ग्रामस्थांनी त्यांना मज्जाव करावा. त्यांची माहिती तत्काळ प्रशासनाला कळवावी." असेही शेख यांनी सांगितले.

ही आहे गावनिहाय यादी
बाहेरच्या जिल्ह्यातून गाव निहाय आलेल्या पाहुण्यांची संख्या अशी : बारागाव नांदूर (७), मल्हारवाडी (३७), सडे (३०), राहुरी खुर्द (२२), डिग्रस (३६), मुळानगर (१९), जांभळी (६), मांजरी (१६), वळण (६१), मानोरी (१९), आरडगाव (४९), शिलेगाव (५४), केंदळ (१३), पाथरे (१४), मालुंजा (८२), उंबरे (१७), धामोरी (१०), कात्रड (३७), गुंजाळे (१२), कुक्कडवेढे (७), खडांबे (१३), वांबोरी (३७), गुहा (३०), तांभेरे (११), कानडगाव (६३), सात्रळ (३३), चिंचोली (७३), कोल्हार (६५), सोनगाव (६७), देवळाली प्रवरा (३२), राहुरी फॅक्टरी (२२), आंबी (१८), चांदेगाव (३१), लाख (१२), कणगर (४६), टाकळीमिया (९), मुसळवाडी (३), चिंचाळे (१४), म्हैसगाव (२५), तहाराबाद (२४).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home quarantine stamp on the hand of 1127 persons at Rahuri