
सांगली : पुणे-मुंबईसह परराज्यातून सांगलीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवावे, अशी मागणी आज येथे झालेल्या ऑनलाईन महासभेत झाली. मात्र त्याऐवजी अशा व्यक्तींना त्यांच्या घरातच 14 दिवस अलगीकरणात रहावे लागेल. त्या प्रत्येकाच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाईल असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्पष्ट केले. सर्वपक्षीय नगरसेवकांची संस्थात्मक अलगीकरणाची मागणी होती मात्र प्रशासनाने दोन हजार लोकांची सोय केल्याचे आयुक्तांनी सांगितले. तथापि ती अतिरिक्त तसेच संशयित वाटल्यास त्यांच्यासाठी ही सोय आहे असा खुलासा त्यांनी केला.
महापालिकेची विशेष सभा झुम ऍपद्वारे झाली. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशी सभा झाली. सभेला 80 हून अधिक नगरसेवक-अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. सुरवातीलाच कोरोना आपत्तीच्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली. मुंबई, पुण्याहून येणाऱ्या नागरिकांबाबतचे धोरण काय अशी विचारणा झाली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुंबईतून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यात शहरात मोठ्या संख्येने बाहेरून लोक येणार आहेत. त्यांना महापालिका क्षेत्रात येण्यास अटकाव करावा अथवा त्यांचे इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करावे, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आयुक्तांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी रोहिणी पाटील, संगीता हारगे, वहिदा नायकवडी, प्रकाश ढंग, निरजंन आवटी यांच्यासह नगरसेवकांनी केली. राज्यातील हॉटस्पॉटमधील लोकांना बाहेर सोडले जाणार नाही. परराज्य अथवा परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना होम क्वारंटाईन करण्याच्या शासनाचा आदेश आहे. तसेच पण काही सोसायट्यात या लोकांना प्रवेश दिला जात नाही. त्यांना कम्युनिटी क्वारंटाईन केले जाईल. दोन हजार लोकांची व्यवस्था होईल, असे नियोजन प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. त्याचवेळी येणाऱ्या प्रत्येकाच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाईल असेही आयुक्तांनी सांगितले. होम क्वारंटाईनमधील अनेक लोक बाहेर फिरत असल्याबद्दलही नर्गिस सय्यद, पांडुरंग कोरे, योगेंद्र थोरात यांच्यासह नगरसेवकांनी तक्रारी केल्या.
पावसाळ्यापूर्वी मंजूर कामे सुरू करण्याचा आग्रहही नगरसेवकांनी धरला. त्याला आयुक्तांनी सहमती दर्शविली. गुंठेवारीतील कामे सुरू करावीत, ऑक्टोबरपर्यंत घरपट्टी, पाणीपट्टीसाठी सक्ती नको, महापालिका शाळेत ई लर्निंग सुरू करण्याची मागणी अभिजित भोसले यांनी केली.
मिरजेतील अमृत योजना व ड्रेनेज योजनेची कामे सुरू करण्याची सूचना नगरसेवकांनी केली. त्यावर आयुक्तांनी या कामावरील मजूर कर्नाटकात अडकले आहेत. त्यांच्या पाससाठी प्रयत्न सुरू आहेत. या योजनांची कामे सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यावेळी सदस्यांनी गोरगरीब, मजुरांच्या धान्य मिळावे, रेशनकार्ड नसलेल्यांना किट मिळावे, परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी नियोजन करावे, त्यांची आरोग्य तपासणी करावी, अशा विविध सूचना करण्यात आल्या.
कोरोना खर्च सर्वांनाच कळेल
कोरोनाच्या खर्चाच्या पारदर्शकतेबाबत स्वाती शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर आयुक्त नितीन कापडणीस यांनी यावरील आजवरच्या खर्चाचा सर्व हिशेब महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल असे स्पष्ट केले. नगरसेवक व नागरिक सर्वजण तो पाहू शकतील. यात काही अनियमितता, गैरप्रकार झाला असेल तर तो समोर येईल. आरोप करणे सोपे आहे, पण वस्तुस्थिती त्यापेक्षा अनेकदा वेगळी असते. हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.