सदाभाऊ खोतांच्या संपर्कातील दोन युवा नेते होम क्वारंटाईन 

शिवाजीराव चौगुले 
Wednesday, 26 August 2020

माजी कृषी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी घरीच थांबून उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्यांच्या संपर्कातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये आता चिंता दाटली आहे. त्यात तालुक्‍यातील दोन बड्या युवा नेत्यांचा समावेश आहे. 

शिराळा (सांगली) ः माजी कृषी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी घरीच थांबून उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्यांच्या संपर्कातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये आता चिंता दाटली आहे. त्यात तालुक्‍यातील दोन बड्या युवा नेत्यांचा समावेश आहे. 

ते आता होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यापैकी एक सम्राट महाडिक असून दुसरे रणधीर नाईक आहेत. हे दोघेही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सदाभाऊंच्या संपर्कात आले होते. दोघांनीही आपल्या कार्यकर्त्यांनाही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

सदाभाऊ खोत कोरोना बाधित झाल्यानंतर घरीच थांबले आहेत. या काळात डॉक्‍टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार करून घेण्याचे त्यांनी ठरवले आहे. तसे त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. त्यांनी चार दिवसांपूर्वी सांगलीत विष्णूअण्णा फळे व भाजीपाला मार्केट येथे आंदोलन केले होते. त्यावेळी अनेकजण त्यांच्या संपर्कात आले होते. शिवाय, इस्लामपूर येथील कार्यक्रमात माजी खासदार धनंजय महाडिक यांचे चुलतबंधू तथा दिवंगत नानासाहेब महाडिक यांचे चिरंजीव सम्राट महाडिक हे त्यांच्या संपर्कात आले होते.

सम्राट यांचा कार्यकर्त्यांचा संच मोठा असून ते सतत कामात राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी खबरदारी म्हणून घरीच राहण्याचे ठरवले आहे. माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचे चिरंजीव तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनीही घरीच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home quarantine of two young leaders in contact with Sadabhau Khota