टॅक्‍सी चालकाचा प्रामाणिकपणा, 13 लाख केले परत 

टॅक्‍सी चालकाचा प्रामाणिकपणा, 13 लाख केले परत 
Updated on

नागठाणे (जि. सातारा) : दहा, वीस हजारांची नव्हे, तर तब्बल तेरा लाख रुपयांची रक्कम. मनात आले असते तर ते पैसे त्या तरुणाला सहज स्वतःकडे ठेवता आले असते. मात्र, मनात मुरलेला प्रामाणिकपणा, सद्‌सद्विवेकबुद्धी त्याहून अधिक महत्त्वाची ठरली. त्यातून ते सारे पैसे त्याने संबंधितांना परत दिले. अविनाश मोरे असे त्या तरूणाचे नाव असून तो मुंबईत टॅक्‍सी चालक म्हणून काम करतो. 

अविनाश मोरे हे त्या तरुणाचे नाव. सातारा शहरालगत असलेल्या उपळी गावचे ते रहिवासी. मुंबईत ते टॅक्‍सीचालक म्हणून काम करतात. प्रामाणिकपणाच्या अनोख्या कृतीमुळे सध्या ते सर्वांच्याच कौतुकाचा विषय बनले आहेत. "सोशल मीडिया'मधूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्री. मोरे यांनी "सकाळ'शी बोलताना याविषयीचा घटनाक्रम उलगडला. "मुंबईतील महालक्ष्मी परिसरात माझ्या टॅक्‍सीत दोन प्रवासी बसले. ते टांझानियन नागरिक होते. त्यांना अंधेरीला जायचे होते. मात्र, काही वेळातच त्यांनी टॅक्‍सी थांबविण्यास सांगितले. मध्येच ते दोघेही उतरले.'' 

अविनाश मोरे म्हणाले,""मी दुपारी जेवणासाठी बहीण नीता यादव (सासपडे) हिच्याकडे आलो. टॅक्‍सीत मागील सीटवर पाहिले असता, एक बॅग दिसली. त्यात मोठी रोकड दिसली. देशी-विदेशी चलन, पासपोर्ट तसेच महत्त्वपूर्ण कागदपत्रांचा त्यात समावेश होता. बहीण अन्‌ मेहुणे राजू यांनी आपण ही बॅग पोलिस ठाण्यात जमा करू, असे सांगितले. बॅगमधील कुरिअर कंपनीच्या पत्त्यावरूनही संबंधितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर हाजीअली पोलिस चौकीत बॅग जमा केली. त्याच दरम्यान, टांझानियन नागरिकही पोलिस ठाण्यात पोचले होते.'' 

या घटनेनंतर सर्वांनीच या आगळ्या प्रामाणिकतेचे कौतुक केले. सुमारे पाच हजार रुपयांची भेटही श्री. मोरे यांना देण्यात आली. यापूर्वीही त्यांनी एका प्रवाशाची मोठी रक्कम प्रामाणिकपणे परत केली होती. मुंबईत कार्यरत असणाऱ्या सातारा जिल्हा टॅक्‍सीचालक-मालक संघटनेने तसेच उपळी येथील ग्रामस्थांनीही त्यांचे अभिनंदन केले. आई-वडील तसेच भाऊ मनोज, अनिल यांनीही कौतुक केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

'Vivekachi Vari' (Procession of Reason) to be held from Sindkhed Raja to Pandharpur between 10th to 18th July
Police Crack Husband Murder Case; Wife and Alleged Lover Taken into Custody
Ashadhi Ekadashi special trains from Miraj
Aitwade Khurd highway land acquisition protest
Marathi News Esakal
www.esakal.com