परगावाचा पाहुणा नको रे बाबा 

The horror of Corona now spread to the countryside
The horror of Corona now spread to the countryside
Updated on

शिराळा : आमच्या घरी कधी येणार म्हणून पाहुण्यांना साद घालणारी मंडळी कोरोनच्या भीतीने पाहुण्यांना बोलावणे दूरच पण एखादा पाहुणा चुकून घरी आला तरी त्याला कळतं नाही का ? ह्या असल्या परिस्थितीत कशाला यायचं म्हणून फणकारे मारणाऱ्याची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे परगावाचा पाहुणा नको रे बाबा अशी अवस्था सर्वत्र झाली आहे. जीवनावश्‍यक वस्तूंच्या काटकसरीने वापर करणे सुरू झाले असून पालेभाज्यांचा वापर लोणच्या प्रमाणे तोंडी लावण्यापुरता केला जात आहे. 

कोरोनाची धास्ती आता ग्रामीण भागात वाढली आहे. जनता संचारबंदी, कोलमडलेली वाहतूक व्यवस्था, लग्न समारंभाला आलेली बंदी यावरून कोरोना किती भयानक आहे याची सर्व सामान्य लोकांना कल्पना आली आहे. हा कोरोना शहरातून आपल्याकडे येऊ नये म्हणून प्रत्येक ठिकाणी त्याची काळजी घेतली जात आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

मात्र पुणे, मुंबई शहरातील अनेक लोक भितीपोटी आपल्या गावाकडे येऊ लागली आहे. गावातील लोकांना आपली मुलं सुरक्षित असावी म्हणून गावी यावे वाटते पण ज्यांची मुलं बाहेरगावी नाहीत त्यांना बाहेरून गावात आलेला माणूस चालत नाही. त्याच्याकडे संशयाने पाहून हा आत्ता कशाला आला.त्याला कळत नाही का अशी चर्चा गाव गावात सुरू होत आहे. काही लोक उपहासात्मक कोरोना आला असे ही बोलू लागले आहेत.

अनेक समारंभ हे घरगुती लोकांच्या उपस्थितीत पार पडले जात आहेत. विनाकारण चौका चौकात रिकामटेकडेपणाने गप्पा मारणाऱ्यांच्या बैठका बंद झाल्याने ते चौक व पार ओस पडले आहेत.जास्ती जास्त लोक घरात बसणे पसंत करत आहेत. एस.टी. वाहतूक बंद झाल्याने लोकांची गैरसोय झाली असली तरी यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दीला आळा बसला आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने काही तास सुरू राहणार असल्याने त्यावेळेत लोकांना खरेदीसाठी बाहेर पडावे लागणार आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Political News
Sangli Municipal Corporation Recruitment
Krishna River Crocodile Sighting
Karnataka Sugar Season Date Yet to Be Announced
Marathi News Esakal
www.esakal.com