आजच्या या प्रकाराबाबत ॲड. ध्यानंजय मद्वाण्णा यांनी ॲनिमल वेलफेअर बोर्डासह जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील जबाबदार यंत्रणांविरोधात व्यापक आवाज उठवला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सांगली : निपचित पडलेला तो खेचराचा देह... आपल्या पोटचं पिल्लू गेलं, याची तिच्या आईला (Mother) जाणीव झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. ती ओरडू लागली, रडू लागली. सैरभैर झाली. पिलाला चाटू लागली, वास घेऊ लागली. तिला वाटलं चमत्कार होईल, पिलू उठेल... तसं काही होणार नव्हतं. माणसांची गर्दी ते पाहून फक्त हळहळत होती. त्यांच्या तरी हाती काय होतं? प्राणीमित्र आले, पालिकेला कळवलं, सहा तासांनी यंत्रणेला जाग आली. माणसं मेली तरी पर्वा न करणाऱ्यांना काय खेचराची किंमत असणार? त्यांनी कचऱ्याच्या गाडीत घालून तो देह नेला.