
आष्टा : वाळवा तालुक्यातील शिगाव येथील हॉटेल चालकाला पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी मारहाण केली. याबाबत आष्टा पोलिस ठाण्यात संशयित विजय बाळू ढोले, ऋतिक राजाराम माळी व एक अनोळखी (सर्व आष्टा, ता. वाळवा) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. फिर्याद हॉटेल चालक संदीप पांडुरंग पाटील (वय ३०, शिगाव, ता. वाळवा) यांनी दिली आहे.