esakal | महापालिकेचा इशारा : घरपट्टी थकबाकीदारांचे डिजिटल लागणार
sakal

बोलून बातमी शोधा

house tax defaulters name will be published on Digital board

महापालिकेच्या घरपट्टी विभागाने 16 कोटींची बिले वसूल करण्यासाठी कंबर कसली असून एक लाखावर थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांचे डिजिटल चौकात लावण्यात येणार आहे. तरीही बिले न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा घरपट्टी विभागाचे कर निर्धारक व संकलक नितीन शिंदे यांनी दिला. 

महापालिकेचा इशारा : घरपट्टी थकबाकीदारांचे डिजिटल लागणार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : महापालिकेच्या घरपट्टी विभागाने 16 कोटींची बिले वसूल करण्यासाठी कंबर कसली असून एक लाखावर थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांचे डिजिटल चौकात लावण्यात येणार आहे. तरीही बिले न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा घरपट्टी विभागाचे कर निर्धारक व संकलक नितीन शिंदे यांनी दिला. 

श्री. शिंदे म्हणाले,""आयुक्त नितीन कापडणीस यांनी उत्पन्न वाढीसाठी वसुली मोहीम जोरदार राबवण्याचे आदेश दिले आहेत. यंदा मार्च अखेर 50 कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट आयुक्त कापडणीस यांनी दिले आहे. आजअखेर 30 कोटी 67 लाख रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित 20 कोटींचे लक्ष्य गाठण्यासाठी वसुलीची धडक मोहीम सुरू आहे. सुमारे 15 हजार थकबाकीदार मालमत्ताधारकांना जप्ती पूर्व नोटिसा बजावल्या आहे. यात एक लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या तीनशे मालमत्ता धारकांची माहिती, फोटो डिजिटलवर चौका चौकात लावले जाणार आहेत. 

सांगली, मिरज व कुपवाड तीनही शहरांतील प्रत्येकी शंभर थकबाकीदारांचा यामध्ये समावेश असून त्यांचे जप्तीचे वॉरंट तयार आहे. सात दिवसांत थकबाकी न भरल्यास त्यांच्या मालमत्तांवर टाच आणण्यात येणार आहे. डिजिटलवर "प्रसिद्धी' मिळण्यापूर्वी मनस्ताप टाळण्यासाठी तातडीने थकबाकी भरावी असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे. या थकबाकीदारांकडे गेल्या 15 ते 20 वर्षांपासूनची सुमारे 16 कोटींची थकबाकी असल्याचे त्यांनी सांगितले. श्री. शिंदे म्हणाले,""घरपट्टी थकबाकीदारांनी एक रकमी बाकी भरल्यास त्यांना दंड, व्याज व शास्तीत 25 टक्के सवलत मिळणार आहे.'' 

नवीन मालमत्तांमुळे साडेपाच कोटींची वाढ 
श्री. शिंदे म्हणाले,""गत वर्षीच्या तुलनेत यंदा पाच हजार 191 नवीन मालमत्ता वाढल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत पाच कोटी 66 लाख रुपयांची वाढ झाली आहे.'' 

तीन मालमत्ता सील 
शहरातील तीन बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. त्यांचा लवकरच लिलाव करण्यात येणार असल्याचे कर संकलक नितीन शिंदे यांनी सांगितले. अभय पाठक यांच्याकडे एक लाख दोन हजार, राजेश उंडाळे 39 हजार, गोपाळ कुलकर्णी 36 हजार रुपयांची थकबाकी गेल्या 18 ते 20 वर्षांपासून आहे. त्यांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. वारंट अधिकारी सुनील पाटील यांच्यासह बाळासाहेब मल्लेवाडे, सुरेश चोरमोले, अंकुश जिमगे यांनी ही कारवाई केली आहे. 

loading image