कशी कराल दहावीची तयारी?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

कधी - शनिवारी (ता. १४)
कोठे - शिवाजी तरुण मंडळ हॉल, जुन्या बलभीम बॅंकेशेजारी, शिवाजी पेठ, कोल्हापूर
केव्हा - सायंकाळी ५
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क - ९५५२५८१९१८

शनिवारी चर्चासत्र; ‘न्यू एज्युकेशन प्लॅन  २०२०’ विषयी माहिती
कोल्हापूर - यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या अभ्यासक्रमाबरोबरच परीक्षा पद्धतीतही आमूलाग्र बदल केले आहेत. या बदलांना सामोरे जाताना अभ्यासाचे नियोजन कसे करावे?, परीक्षेचे नेमके स्वरूप यांविषयी विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन हवे असते. याच उद्देशाने ‘सकाळ विद्या’ व ‘क्रिएटिव्ह ॲकॅडमी’तर्फे येथे शनिवारी (ता. १४) चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

शालेय अभ्यासक्रमात प्रश्‍नपत्रिका व विषयांनुरूप झालेले बदल समजून घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांसाठी हे चर्चासत्र महत्त्वाचे आहे. संपूर्ण अभ्यासक्रम व मूल्यमापन पद्धत विद्यार्थिकेंद्रित असल्यामुळे विषयानुरूप योग्य नियोजन व आकलन महत्त्वाचे आहे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार प्रश्‍नपत्रिकांचे स्वरूप कसे असेल, त्या अनुषंगाने अभ्यासाचे व वेळेचे नियोजन कसे असावे? परीक्षेला तीनच महिने असल्याने अभ्यास कसा करावा?, परीक्षेचे ओझे न बाळगता परीक्षेला कसे सामोरे जावे? याविषयी समुपदेशन या चर्चासत्रात केले जाईल. पुण्यातील नामांकित वक्‍ते प्रा. एन. ए. शेख मार्गदर्शन करतील. ‘सातवी-आठवी’च्या विद्यार्थी व पालकांनी शिक्षणाचे बदलते स्वरूप म्हणजेच ‘न्यू एज्युकेशन प्लॅन २०२०’ विषयी जाणून घेण्यासाठी उपस्थित राहावे.’’ दहावी हा भावी करीअरचा पाया असल्याने बरेचदा अपुऱ्या माहितीमुळे पालक पाल्यासाठी कोणते करीअर योग्य आहे, याबाबत साशंक असतात. दहावीनंतर मेडिकल व इंजिनीअरिंगव्यतिरिक्त उपलब्ध असणारे करीअरचे पर्याय, विद्यार्थ्यांचा कल पाहून योग्य पर्यायांची निवड कशी करावी? दहावीनंतर होणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शिक्षण संस्था व त्यांची तयारी कशी करावी, यांविषयी सखोल मार्गदर्शन या चर्चासत्रातून मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How do you prepare for class tenth