अर्सेनिकम अल्बम कसे काम करते?  वाचा

 How does the Arsenicum album work?
How does the Arsenicum album work?

अर्सेनिकम अल्बम हे मूलद्रव्य एक मेटलॉईड आहे. म्हणजे ना धड धातू ना अधातू. पृथ्वीवर बऱ्याच प्रमाणात आहे. पाण्यातही असते थोड्या प्रमाणात. होमिओपॅथीचे मूलतत्त्व आहे. एखादा पदार्थ शरीरात गरजेपेक्षा जास्त झाला की शरीरात जी लक्षणे उत्पन्न होतात ती लक्षणे त्याच पदार्थाचे विरळीकरण म्हणजे "डायल्युशन' करून दिल्यास ती नाहीशी होतात असा तो ढोबळ सिद्धांत आहे. या औषधाच्या सूक्ष्मतेला किंवा विरळीकरणाला "पोटन्सी' असे म्हणतात. 

औषधाचे द्रावण बनवतात. त्याला मदर टिंक्‍चर, म्हणतात. एक भाग मदर टिंक्‍चर आणि 99 भाग द्रावण घेऊन ते एकजीव करतात. ही झाली एक पोटन्सी. म्हणजे त्यात मूळ औषध एक टक्काच राहते. त्यातील एक भाग घेऊन परत हीच क्रिया केली की पोटन्सी दोन झाली म्हणजे त्यात मूळ औषध हजारात एक असे झाले. असे तीस वेळा केले की 30 पोटन्सी झाली. 
"अर्सेनिकम अल्बम 30' यातील 30 चा अर्थ त्या औषधाची "पोटन्सी 30' असा आहे. म्हणजेच त्या औषधात अर्सेनिकचा एखादाही अणू सापडणे मुश्‍कील. मग त्याचा विषारीपणा कुठून असणार. त्याच्याशी कुठलीही केमिकल रिएक्‍शन होणारच नाही. मात्र अर्सेनिकची जी लक्षणे आहेत. तशी लक्षणे शरीरात दिसल्यावर जर हे औषध दिले तर ती लक्षणे नाहीशी होतात. 

आता कोविड 19 या विषाणूमुळे होणाऱ्या आजारात जी सगळी लक्षणे आहेत ती सगळी लक्षणे अर्सेनिक औषधाचीही आहेत. हे औषध घेतल्यावर त्याने सूक्ष्म प्रमाणात तीच लक्षणे तयार होतात. आपल्याला ती कळणारही नाहीत. पण शरीराच्या हेरखात्याला ते लगेच कळते त्यांना कोविड 19चे व्हायरस आल्यासारखे वाटते आणि त्यासाठीची प्रतिजैविके, म्हणजेच अँटीबॉडीज तयार होऊ लागतात. ही कोविड 19 वर लागू होणारीच असतात. ही प्रतिजैविके शरीरभर कोविड 19 च्या विषाणूंना शोधत राहतात. आणि महिन्या दोन महिन्यांनी विरून जातात. म्हणून हे औषध महिन्यानंतर साथ राहिलीच तर परत घ्यायचे असते. मधल्या काळात जर काही विषाणू शरीरात शिरलेच तर लगेच या आधीच तयार असलेल्या सैन्याने त्यांचा नाश होतो. 

कुठल्याही होमिओपॅथी डॉक्‍टरांच्या मदतीने प्रत्येकाने आपल्याला कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून हे घ्यायचे असे आयुष मंत्रालयाने सुचवले आहे. घरातील सर्वांनी सकाळी चूळ भरून सहा गोळ्या घ्यायच्या. गोळ्यांना हात लावायचा नाही. झाकणात घेऊन सरळ जिभेवर टाकून चोखायच्या. मग अर्धा तास ब्रश खाणे पिणे काही करायचे नाही. पाणी प्यायला हरकत नाही. असे फक्त तीन दिवस करायचे. दिवसातून फक्त एकदाच सकाळी गोळ्या घ्यायच्या. याचे काहीही साईड इफेक्‍ट नाहीत. सेफ आहे. 
आपण सगळे सेफ होऊया आणि आपल्या देशालाही या दहशतीतून मुक्त करूया. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com