महापुराच्या काळात किती मदत केली?; मंत्री विश्‍वजित कदम यांचा सवाल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

सांगली : कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी करणाऱ्या विरोधकांची टीका आश्‍चर्यकारक आहे. महापुराच्या काळात काय घडले हे सर्वांना माहिती आहे. केंद्र सरकारने किती मदत केली? किती महाराष्ट्रातील शेतकरी, गोरगरिबांना मदत केली? गेले दोन महिने कोरोनाच्या संकटात एकीकडे मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करणे राहिले बाजूला दुसऱ्याच गोष्टीचे राजकारण सुरु आहे अशी टीका कॉंग्रेसचे नेते राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी केली. 

सांगली महापालिकेत आज कॉंग्रस, राष्ट्रवादी सदस्यांची मंत्री डॉ. कदम यांनी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात भाजपने केलेल्या आंदोलनावर टीका केली. ते म्हणाले, "संचारबंदी, लॉकडाऊन लागू आहे. त्यासाठी राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. तो कुठल्या पक्षासाठी, जातीधर्मासाठी नाही. त्यामुळे या काळात कुणी राजकारण करु नये, प्रदर्शन, आंदोलन करु नये.' 
मंत्री डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले, विरोधकांनी मुख्यमंत्री निधीला मदत करु नये पंतप्रधान निधीला मदत करावी असे सांगून पक्षीय राजकारण करु नये. त्यापेक्षा केंद्राकडून राज्यात जास्तीत जास्त मदत आणण्याबाबत मोलाची भूमिका पार पाडावी. राज्यात कोरोनाविरुध्दच्या लढ्यात आरोग्य, पोलिस, प्रशासन यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी चांगले काम करत आहेत. त्यांचे मनोबल वाढेल अशी भूमिका घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत या विरोधकांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे मंत्रालयात थांबून चांगले काम करत आहेत. तसेच सर्व मंत्रीही आपआपल्या खात्याच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात चांगले काम करत आहेत. लोकांच्या सेवेसाठी सरकार मनापासून काम करत आहे, अशी त्यांनी ग्वाही दिली. 

उत्तर प्रदेश, कर्नाकटची टाळाटाळ 
कोरोनामुळे राज्यात अडकलेल्या इतर राज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्यात, गावी परत जाण्यासाठी याद्या तयार करुन त्यांच्यासाठी केंद्राने रेल्वेची सोय करावी अशी वारंवार मागणी करुनही उत्तर प्रदेश, कर्नाटकसारख्या राज्यांनी गेले 20 दिवस टाळाटाळ केली हे दुर्दैवी आहे, अशी टीका मंत्री डॉ. कदम यांनी केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How much did it help during the flood ?; Question from Minister Vishwajit Kadam