सोलापूर शहर-जिल्ह्यात पुन्हा कोरोनाची शंभरी ! शहरात पाच जणांचा मृत्यू; 'या' भागात सापडले नवे रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

ठळक बाबी... 

  • बुधवारी सोलापूर शहरात 90 तर ग्रामीण भागात सापडले 20 कोरोना पॉझिटिव्ह 
  • ग्रामीणमध्ये तिघांचा तर शहरातील पाच जणांचा आज झाला कोरोनामुळे मृत्यू 
  • 232 अहवालांपैकी 90 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; प्रलंबित 302 अहवालाने वाढविली चिंता 
  • शहरात 59 वर्षांवरील पाच जणांचा मृत्यू; आज 59 जणांनी केली कोरोनावर मात 

सोलापूर : शहर-जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी (ता. 8) सोलापूर शहरात 90 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून ग्रामीण भागातील 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे शहरात पाच जणांचा तर ग्रामीणमध्ये तिघांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भवानी पेठ, उमा नगरी, एकता नगर, सिध्दी अर्पाटमेंट आणि, अभिषेक नगर येथे प्रत्येकी चार तर शाहीर वस्तीत सर्वाधिक सात रुग्ण सापडले आहेत. 

 

'या' भागात सापडले नवे रुग्ण 

सोनामाता नगर, लक्ष्मण सोसायटी (विजयपूर रोड), शाहीर वस्ती, होमकर नगर (भवानी पेठ), एकता नगर (अशोक चौक), शिवगंगा नगर, बनशंकरी नगर (शेळगी), आंबेडकर नगर, सिध्दी अपार्टमेंट (सम्राट चौक), मल्लिकार्जुन नगर, गजानन नगर, बसवेश्‍वर नगर (मजरेवाडी), कल्याण नगर, जुळे सोलापूर, रविशंकर गार्डन (जुळे सोलापूर), जुनी पोलिस लाईन, अभिषेक नगर (मुरारजी पेठ), उमा नगरी, कृष्णा कॉलनी (सैफूल), इस्ट हाय अर्पाटमेंट (साईबाबा चौक), विडी घरकूल (हैदराबाद रोड), थोबडे वस्ती (देगाव नाका), दक्षिण कसबा (जोशी गल्ली), लोधी गल्ली (उत्तर सदर बझार), हुच्चेश्‍वर नगर, लक्ष्मी नगर, मार्कंडेय नगर (कुमठा नाका), विडी घरकूल, वडार गल्ली (बाळीवेस), उत्तर कसबा, सत्यनाम नगर (लष्कर), कामत वसाहत (एमआयडीसी रोड), पूर्व मंगळवार पेठ, एमएनसी कॉलनी (बुधवार पेठ), पश्‍चिम मंगळवार पेठ, गांधी नगर, गोल्डफिंच पेठ, कमला नगर, भवानी पेठ, टिळक चौक, मुरारजी पेठ, खडक गल्ली, गवई गल्ली (टिळक चौक), रविवार पेठ, भाग्यश्री पार्क (होटगी रोड), यश पॅलेस, अवंती नगर, अश्‍विनी हॉस्पिटलजवळ, शेळगी, जुनी विडी घरकूल, उत्तर कसबा, ललिता नगर (शांती रोड) आणि रंगराज नगर याठिकाणी नवे रुग्ण सापडले आहेत. 

ठळक बाबी... 

  • बुधवारी सोलापूर शहरात 90 तर ग्रामीण भागात सापडले 20 कोरोना पॉझिटिव्ह 
  • ग्रामीणमध्ये तिघांचा तर शहरातील पाच जणांचा आज झाला कोरोनामुळे मृत्यू 
  • 232 अहवालांपैकी 90 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; प्रलंबित 302 अहवालाने वाढविली चिंता 
  • शहरात 59 वर्षांवरील पाच जणांचा मृत्यू; आज 59 जणांनी केली कोरोनावर मात 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds of corona possitive Patient again in the solapur city-district