
इस्लामपूर: ‘इस्लामपूरचे नामकरण केवळ ‘ईश्वरपूर’ नव्हे, तर ‘उरुण-ईश्वरपूर’ व्हावे, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी उपोषण आज सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी दिलेल्या शब्दावर काही काळासाठी स्थगित करण्यात आले. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार लवकरच ‘उरुण-ईश्वरपूर’ असे नामकरण होईल,’ असा विश्वास उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला. ‘उरुण-ईश्वरपूर’ न झाल्यास व राजकीय नेत्यांनी दिलेला शब्द फिरवल्यास हे आंदोलन पुन्हा एकदा जोरदार केले जाईल, असा इशाराही उरुणचे पोलिस पाटील बाळासाहेब पाटील यांनी दिला.