निराधारांसाठी धावला वर्दीतील माणूस...

शंकर भोसले
Tuesday, 24 March 2020

मिरज येथील जमावबंदीमुळे निराधार आणि भिकाऱ्यांवर एकवेळच्या पोटाची खळगी भरण्याचे संकट ओढावले. या निराधारांकडून रस्त्यावर पडेल ते अन्न खात असल्याचे पाहून, खाकी वर्दीतली माणुसकी जागली झाली. त्यांना पोटभर अन्न खाऊ घालण्यात आले. 

मिरज : येथील प्रसिद्ध मिरासाहेब दर्ग्याच्या उरूसानिमित्त कर्नाटक राज्यसह महाराष्ट्रातील निराधार, भिकाऱ्यांचा वावर आधिक असतो. मात्र यंदा कोरोना रोगाच्या पार्श्वभुमीवर कर्फ्यू आणि जमावबंदी लागू असल्यामुळे शहरातील जनजीवन ठप्प झाले आहे.

जमावबंदीमुळे निराधार आणि भिकाऱ्यांवर एकवेळच्या पोटाची खळगी भरण्याचे संकट ओढावले. या निराधारांकडून रस्त्यावर पडेल ते अन्न खात असल्याचे पाहून, खाकी वर्दीतली माणुसकी जागली झाली. त्यांना पोटभर अन्न खाऊ घालण्यात आले. 

सध्या मिरज शहरात ख्वाजा मिरासाहेब ऊरूसाच्या अनुषंगाने दरवर्षी शहरात शंभरहून अधिक भिकारी आणि निराधार ऊरूसामध्ये चार पैसे गोळा करण्यासाठी दाखल झाले आहेत. मात्र यंदा कोरोनामुळे ऊरूस रद्द झाला आणि त्यांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. मग ते रस्त्यावर पडेल ते अन्न खाऊ लागले. याची दखल घेत शहरातील हॉटेलमध्ये अन्न तयार करून निराधार आणि भिकाऱ्यांना खाऊ घालण्याचे काम शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक इंद्रजीत वर्धन यांनी केले. त्यांनी शहरातील बस, रेल्वे स्थानक आणि इतर ठिकाणी निराधार आणि भिकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना पोठभर अन्न खाऊ घालण्याचे गेले दोन दिवस चोखपणे केले आहे.

पोलिस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांनी देखिल रेल्वे स्थानकाच्या आवारातील निराधार आणि दिव्यांग भिकाऱ्यांच्या पोटा पाण्याची सोय केली. दोन दिवस उपाशी राहिल्यानंतर पोटभर जेवल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The hungry orphans provided food to beggars in miraj