Sangli Crime : चारित्र्याच्या संशयावरून आयर्विन पुलाखाली पत्नीचा चिरला गळा; चाँदतारा मशीदजवळ पतीला पोलिसांनी केली अटक

Sangli Police Case : जाकाप्पा याच्या त्रासाला कंटाळून प्रियांका ही चार-पाच महिन्यांपासून माहेरी सांगलीवाडी परिसरात राहत होती. ती एका साडी सेंटरमध्ये कामाला जात होती.
Sangli Police Case
Sangli Police Caseesakal
Updated on
Summary

मृत प्रियांका चव्हाण हिचा जकाप्पा चव्हाण याच्याशी विवाह झालेला होता. दोघांना मुलगा-मुलगी होती.

सांगली : येथील आयर्विन पुलाखाली पत्नीचा गळा चिरून (Murder Case) पळून गेलेल्या संशयित पतीस चोवीस तासांत शहर पोलिसांच्या (Sangli Police) गुन्हे प्रकटीकरण शाखेने गजाआड केले. चारित्र्याच्या संशयावरून हा खून केल्याची त्याने कबुली दिसून जकाप्पा शिवमूर्ती चव्हाण (वय ३६, काखंडकी, ता. बबलेश्वर, जि. विजापूर) असे त्याचे नाव आहे. जयसिंगपूर हद्दीत थरारक पाठलाग करून ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com