हुतात्मा बागेत 'इतिहास आणि आधुनिकतेचा' अनोखा संगम 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 15 डिसेंबर 2018

हुतात्मा बागेतील आकर्षण 
- 170 अत्याधुनिक पद्धतीचे दिवे 
- आकर्षक खेळणी 
- मुलांसाठी अभ्यासिका 
- रंगीत कारंजाचे आकर्षण 
- लाल मातीचा ट्रॅक 
- विविध प्रकारची फुलझाडी

सोलापूर : भुईकोट किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोचविता या परिसराला आधुनिकतेची जोड देत येथील हुतात्मा बागेचा विकास करण्यात येत आहे. उजाड माळरानाचे स्वरूप असलेल्या या बागेचे सौंदर्य आता बहरले आहे. त्यामुळे "इतिहास आणि आधुनिकते'चा अनोखा संगम या ठिकाणी बघायला मिळणार आहे. 

पुरातत्त्व विभागाची परवानगी न मिळाल्याने या बागेतील कामे थांबली होती. मात्र, आता परवानगी मिळाल्याने कामांना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (ता. 17) सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते या बाग नूतनीकरणाचे उद्‌घाटन नियोजित आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्यास उद्‌घाटन करता येईल या हेतूने या बागेतील कामे वेगाने करण्यात येत आहेत. 

भुईकोट किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोचविता नैसर्गिक प्रकारचे साहित्य वापरण्यात आले आहे. त्यामुळे हुतात्मा बागेत अनोखी रंगसंगती दिसून येत आहे. खंदक बागेत फरशीचा ट्रॅक करण्यात आला आहे. बेंच बसविण्यात आले आहेत. तसेच चौपाटीकडून तसेच हिराचंद नेमचंद वाचनालयासमोरून खंदक बागेत जाणारा रस्ताही दुरुस्त करण्यात आला आहे. एकंदरीतच, हुतात्मा बाग आणि खंदक बागेत अत्याधुनिक पद्धतीने सुधारणा करण्यात आल्या आहेत. 

हुतात्मा बागेतील आकर्षण 
- 170 अत्याधुनिक पद्धतीचे दिवे 
- आकर्षक खेळणी 
- मुलांसाठी अभ्यासिका 
- रंगीत कारंजाचे आकर्षण 
- लाल मातीचा ट्रॅक 
- विविध प्रकारची फुलझाडी

Web Title: Hutatma bagh in Solapur