
सांगली व सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर डोंगर असून डोंगरावरती वन विभागाने करोडो रुपये खर्च करून वृक्ष लागवड केलेली आहे. वन विभाग दरवर्षी वृक्ष लागवड करतात. व दरवर्षी त्या डोंगराला आग लागलेली असते त्यामध्ये वृक्ष व गवत जळून खाक होतात.
झरे : सांगली व सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर डोंगर असून डोंगरावरती वन विभागाने करोडो रुपये खर्च करून वृक्ष लागवड केलेली आहे. वन विभाग दरवर्षी वृक्ष लागवड करतात. व दरवर्षी त्या डोंगराला आग लागलेली असते त्यामध्ये वृक्ष व गवत जळून खाक होतात.
डोंगरावरील झाडेझुडपे व गवताला आग लागण्याची परंपरा अनेक वर्षासापासून आहे. नक्की आग कोण लावतंय हे अद्याप समजले नाही. परंतु सांगली जिल्ह्यातील पिंपरी बुद्रुक पासून ते सातारा जिल्ह्यातील तरसवाडी , गारळेवाडी कलेढोन हद्दीतील घाटापर्यंत दरवर्षीच डोंगराला आग लागलेली असते. सामाजिक कार्यकर्ते गोरख पवार यांनी सातारा व सांगली वन विभागांना निवेदने दिली आहे. या निवेदनामध्ये म्हटले आहे की आत्तापासूनच वनविभागाने लागणाऱ्या आगी चे व्यवस्थापन व उपाय योजना करावी असे म्हटले आहे.
त्यावरून वनविभागाने म्हटले आहे की दरवर्षीच आग लागून गवत झाडेझुडपे जळून खाक होतात त्याची यावर्षी आम्ही उपाययोजना व्यवस्थापन आतापासूनच करीत आहोत असे गोरख पवार यांना वन विभागाने कळविले आहे. दरम्यान, शासन मोठ्या उत्साहाने झाडे लावा झाडे जगवा हि घोषणा करीत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून प्रत्यक्षात झाडे लावली जातात. परंतु दर वर्षी झाडे आगीत खाक होतात याकडे कोणाचे लक्ष नाही.
मोठे नुकसान
उन्हाळ्यात गवत जाळल्यानंतर पावसाळ्यात पाऊस पडला की पुन्हा गवत चांगल्या पद्धतीने गुराढोरांना खाण्यासाठी येते म्हणून कोणीतरी दर वर्षी डोंगरावर आग लावतात. त्यामध्ये वन विभागाचे कोट्यवधीचे नुकसान होत आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार