esakal | माझ्या मिशीला खरकट नाही - राजू शेट्टी
sakal

बोलून बातमी शोधा

raju shetti

सांगली ः माझ्या मिशीला कुणाचं खरकटं लागलेलं नाही. त्यामुळे माझ्या जिभेला धार आहे. ही धार संपली की मी थांबेन, तोवर माझा लढा सुरुच राहील, अशी भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

माझ्या मिशीला खरकट नाही - राजू शेट्टी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली ः माझ्या मिशीला कुणाचं खरकटं लागलेलं नाही. त्यामुळे माझ्या जिभेला धार आहे. ही धार संपली की मी थांबेन, तोवर माझा लढा सुरुच राहील, अशी भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.


येथील राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टतर्फे आयोजित जनसेवा पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. श्री. शेट्टी यांना नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार तर नाशिक जिल्ह्यातील कृषी उद्योजक विलास शिंदे यांना राजमती नेमगोंडा पाटील जनसेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

श्रवणबेळगोळचे भट्टारक पट्टाचार्य चारुकिर्ती महास्वामीजी यांच्या हस्ते हा गौरव सोहळा संपन्न झाला. व्यासपीठावर संयोजक, ट्रस्टचे मानद सचिव सुरेश पाटील उपस्थित होते. श्री. शिंदे यांच्यातर्फे कंपनीचे व्यवस्थापक मंगेश भास्कर यांनी पुरस्कार स्विकारला. यानिमित्ताने राजतमी भवनच्या वातानुकुलित विभागाचे उद्‌घाटन झाले.


श्री. शेट्टी म्हणाले, ""केवळ रस्त्यावर संघर्ष करून शेतमालाला दर मिळत नाही तर त्यासाठी लढ्याला धोरणात बदलावे लागते. ते काम दिल्लीत जावून करणे मला शक्‍य झाले. मग तो उसाचा दर असो किंवा दूधाचा दर. विधानसभेत आणि लोकसभेत एका सदस्याची ताकद काय असते हे मी दाखवू शकलो. कारण या दोन्ही ठिकाणी कोणतेही धोरण ठरवताना ते शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी आणि दलालांचे हिताचे कसे असेल, यावर भर दिला जातो. 62 टक्के शेतकऱ्यांचे अर्थकारण स्थिर व्हावे, असे कुणालाच वाटत नाही. ते व्हावे म्हणून माझा लढा चालूच राहील.''


चारुकिर्तीजी महास्वामी म्हणाले, ""शेतकऱ्याच्या हितासाठी झटणाऱ्या माणसांचा गौरव हा देशाच्या कृषी क्षेत्राचा गौरव आहे. राजू शेट्टींचा लढा मोठा आहे. या लढ्यातून उभा राहिलेला शेतकरी विदेशापर्यंत कसा पोहचेल, असे काम विलास शिंदे यांची कंपनी करतेय.''