I Will Vote : बिंदू चौकात बुधवारी मानवी साखळी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - "सकाळ' माध्यम समूह आणि "जिल्हा प्रशासन' यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेलाही मतदान करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. बुधवारी (ता. 9) सकाळी 7.30 ला बिंदू चौक येथे "मानवी साखळी' केली जाणार आहे.

कोल्हापूर - "सकाळ' माध्यम समूह आणि "जिल्हा प्रशासन' यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेलाही मतदान करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. बुधवारी (ता. 9) सकाळी 7.30 ला बिंदू चौक येथे "मानवी साखळी' केली जाणार आहे. यासाठी शहरातील सर्व महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, तरूण मंडळे, सामाजिक संस्था, क्रीडा संस्था सहभाग घेत आहेत. "सकाळ' आणि "जिल्हा प्रशासन' यांनी मानवी साखळीत सहभागी होण्यासाठी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, विभागीय शिक्षण सहसंचालक डॉ. साळी, सकाळचे निवासी संपादक निखिल पंडितराव, उपसरव्यवस्थापक रविंद्र रायकर उपस्थित राहणार आहेत. 

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर "सकाळ' आणि "जिल्हा प्रशासन' यांनी मतदान जनजागृतीसाठी शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकामध्ये भव्य मानवी साखळी केली होती. याला 12 हजारहून अधिक लोकांनी उर्त्स्फुत प्रतिसाद दिला.

विधानसभेसाठी सोमवारी (ता. 21 ऑक्‍टोबर) होत आहे. यापार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील दहा ही विधानसभा मतदार संघातील मतदारांनी निर्भय आणि पारदर्शीपणे मतदान केले पाहिजे. एक मत, लोकशाही बळकट करू शकते, ही भूमिका लोकांपर्यंत पोचवण्यासाठी "सकाळ' आणि "जिल्हा प्रशासन' यांनी पुढाकार घेतला आहे. याला महाविद्यालये, स्वंयसेवी संस्था, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, संघटना, ब्लड बॅंक, खेळाडू, तरूण मंडळांचे कार्यकर्ते उर्त्स्फुत प्रतिसाद देत आहेत. यामध्ये प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवला पाहिजे, असे आवाहन सकाळी आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन केले जात आहे. 

मतदारांनी मतदान जागृतीसाठी "मानवी साखळी'मध्ये सहभाग घेतला पाहिजे. बिंदू चौकात होणाऱ्या या मानवी साखळीसाठी योग्य प्रकारे नियोजन केले आहे. निर्भयपणे मतदान करावे, हाच यातून संदेश दिला जाणार आहे. आपल्या एका मतामुळे चांगला उमेदवार लोकप्रतिनिधी नियुक्त करता येणार आहे. 
- दौलत देसाई
जिल्हाधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I will Vote Sakal Event on Wednesday in Bindu Chouk