
सांगली : कोरोना अद्यापही संपलेला नाही. जगातील काही देशांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. जिल्ह्यात पुन्हा लाट आलीच तर साडेतीन हजार बेड तयार ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले,""कोरोना अद्यापही संपलेला नाही, याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. आगामी दिवाळी सण खरेदीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी ग्राहकांसाठी "नो मास्क-नो एंट्री' चे केवळ फलक नव्हे तर त्यांची अंमलबजावणी करावी. स्वतःही नियम पाळावेत. प्रशासन कडक नियमांची अंमलबजावणी करू शकते. मात्र त्याविरोधात पुन्हा लोकांची ओरड सुरू होते. तरीही नियम सोडून वागणाऱ्यांची संख्या वाढली तर पुन्हा एकदा कारवाईची भूमिका घ्यावीच लागेल. काही देशात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आहे.
पुन्हा लॉकडाऊन सुरू करण्यात आलेले आहे. साथीच्या काळात आपण जिल्ह्यात सव्वातीन हजार बेडची सोय केलेली होती. राज्य सरकारच्या सूचनेनुसार त्यात आणखी जादा 10 टक्के रुग्णसंख्या ग्रहित धरून सर्वसाधारणपणे 3500 बेडसंख्या राहील, याचे नियोजन केलेले आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही.''
जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले,""जिल्ह्यात ऑक्सिजनसाठा चार पटीने वाढवला आहे. 24 हजार लिटर ऑक्सिजनचा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. त्याचाही भविष्यात फायदा होईल. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. केवळ मास्कच नव्हे तर दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.''
दररोज 3 हजार चाचण्या सुरुच - डॉ. संजय साळुंखे
सद्यास्थितीत कोरोनाची साथ आटोक्यात आली असली तरी दररोज आरटीपीसीआर एक हजार आणि रॅपीड ऍन्टींजेन दोन हजार चाचण्या घेतल्या जात आहेत. गेल्या सात दिवसात केवळ दोन हजार रुग्ण आढळले. रुग्णांचा रिकव्हरी रेट 3.6 आहे. डबलींग रेट यापूर्वी 9 दिवसांचा होता, तो आता 21 दिवसांवर आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
संपादन ः प्रफुल्ल सुतार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.