कोयना परिसरात पावसाचा जोर राहिल्यास आजपासूनच विसर्ग...      चांदोली, कोयना परिसरात मुसळधार पाऊस;

विष्णू मोहिते
Thursday, 6 August 2020

गली ः चांदोली धरण आणि कोयना धरण परिसरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर असाच सुरु राहिली तर कोयना धरणातून आज सायंकाळपासून दोन ते 5 हजार क्‍युसेकने विसर्ग केला जाईल, असे प्रशासनाने जाहिर केले आहे. दरम्यान, चांदोली धरण परिसरात आज तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपले. सकाळी आठ वाजेपर्यंत 165 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणीपातळी गेल्या 24 तासात 10 फुटावरुन 22 फुटापर्यंत वाढली आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सांगली जिल्ह्यासाठी एनडीआरएफची दोन टीम दाखल झाल्या आहेत. त्यातील एक सांगलीत तर दुसरी टीम आष्टा येथे आहे. 

 

सांगली ः चांदोली धरण आणि कोयना धरण परिसरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर असाच सुरु राहिली तर कोयना धरणातून आज सायंकाळपासून दोन ते 5 हजार क्‍युसेकने विसर्ग केला जाईल, असे प्रशासनाने जाहिर केले आहे. दरम्यान, चांदोली धरण परिसरात आज तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपले. सकाळी आठ वाजेपर्यंत 165 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणीपातळी गेल्या 24 तासात 10 फुटावरुन 22 फुटापर्यंत वाढली आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सांगली जिल्ह्यासाठी एनडीआरएफची दोन टीम दाखल झाल्या आहेत. त्यातील एक सांगलीत तर दुसरी टीम आष्टा येथे आहे. 

पावसाचा जोर वाढत असल्याने नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. कोयना परिसरात गेल्या 24 तासात 202 मिलिमिटर पाऊस पडला. महाबळेश्‍वरला 183 आणि नवजाला 235 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासात 81 हजार 64 क्‍युसेक पाणी गोळा झाले आहे. 
जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आजही कायम राहिला. पावसाचा मंगळवारी जोर वाढला तो आजही कायम राहिला. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात मुसळधार पाऊस आहे. शिराळा तालुक्‍यात तिसऱ्या दिवशीही अतिवृष्टी झाली. वारणा नदीच्या पातळीत मोठी वाढ होत आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. 
गेल्या 48 तासात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मांगले-काखे हा वारणा नदीवरील पूल तसेच मांगले-सावर्डे, कोकरूड-रेठरे, शिराळे खुर्द-माणगाव, शिगाव, दुधगाव, समडोळी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाचा पाणीसाठा वाढत होत आहे. पावसाचा जोर वाढला तर आठवड्यात चांदोली धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्‍यता आहे. 

कृष्णेची पाणीपातळी- 
नद्यांची पाणीपातळी पुढीप्रमाणे आहे. कोयना कराड 24.09 फूट, कृष्णा 16.3, बहे 9.5, ताकारी 24.9, भिलवडी 23, आयर्विन सांगली 22, अंकली 24.8 आणि म्हैसाळ बंधारा 32 फूट. 

 

शिराळा तालुक्‍यात 85 मिलिमिटर पाऊस 
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 25.95 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्‍यात सर्वाधिक 85 मिलिीमिटर पाऊस पडला. गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आजअखेर पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमिटरमध्ये अशी- मिरज 28.8 (301.1), तासगाव 17.7 (286.6), कवठेमहांकाळ 17.5 (355.7), वाळवा-इस्लामपूर 35.2 (330.8), शिराळा 85 (720.9), कडेगाव 16.8 (287.2), पलूस 17.8 (244.4), खानापूर-विटा 11.6 (395.4), आटपाडी 5.4 (253.0), जत 4.4 (204.8). 

 
चौकट... 
धरण, पाणीसाठा ( टी. एम. सी) 
वारणा, 28.12 
कोयना, 65.65 
अलमट्टी, 94.36 
........................................... 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If there is heavy rain in Koyna area, it will start from today ... Chandoli, torrential rain in Koyna area;