दिवाळीनंतर कोरोनाची नवी लाट आल्यास यंत्रणा सज्ज ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

If there is a new wave of corona after Diwali, keep the system ready

दिवाळीनंतर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येईल, असे इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तो लक्षात घेता तपासणी किट, बेड, ऑक्‍सीजन आणि व्हेंटीलेटरसह सर्व यंत्रणा सज्ज ठेवा, असा आदेश अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी जिल्हा परिषदेत स्थायी समितीत दिले. 

दिवाळीनंतर कोरोनाची नवी लाट आल्यास यंत्रणा सज्ज ठेवा

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : दिवाळीनंतर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येईल, असे इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तो लक्षात घेता तपासणी किट, बेड, ऑक्‍सीजन आणि व्हेंटीलेटरसह सर्व यंत्रणा सज्ज ठेवा, असा आदेश अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी जिल्हा परिषदेत स्थायी समितीत दिले. 

सौ. कोरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायीची ऑनलाईन बैठक झाली. कोविड संदर्भात आढावा घेण्यात आला. सध्या रूग्णसंख्या कमी झाल्याने जिल्हा स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्रातील जे डॉक्‍टर नियुक्त केले होते, त्यांना मुळ ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अंकलखोप येथे ऊस तोडणी टोळ्या मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात जादा कर्मचारी देण्याची मागणी सदस्यांनी केली. 

शिराळयातील कोकरूड, मणदूर प्राथमिक केंद्र व हातेगाव उपकेंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. तातडीने दुरूस्तीच्या सूचना देण्यात आल्या. नगरपंचायतीच्या ठिकाणी ज्या आशा कार्यरत आहेत, त्यांचे मानधन देण्याची मागणी सदस्यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी पुरात ज्यांचे नुकसान झाले त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे निधी मागणीचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय आला. निवृत्त प्राथमिक शिक्षकांना निवृत्तीनंतरचे लाभ देण्यासाठी संबंधितांची यादी तयार करावी, अशी सूचना दिली. माळवाडी, दुधगाव येथील जिल्हा परिषद शाळांत शिक्षक संख्या कमी असल्याने शैक्षणिक अडचण झाली आहे. त्याठिकाणी तातडीने शिक्षक देण्याची मागणी करण्यात आली.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

loading image
go to top