इचलकरंजी: आयजीएम रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची मागणी

पंडित कोंडेकर
शनिवार, 16 जून 2018

आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरीत केले आहे. पण अद्याप पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुुरु नसल्यांने अनेक वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने रुग्णालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. 

इचलकरंजी : आयजीएम रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्याच्या मागणीसाठी आज कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. रुग्णालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ.रवीकुमार शेटे यांना निवेदन देवून आंदोलकांनी चर्चा केली. जून अखेर जर रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुुरु न केल्यास रुग्णालयाचे कामकाज बंद पाडण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिली. 

आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरीत केले आहे. पण अद्याप पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुुरु नसल्यांने अनेक वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने रुग्णालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. 

आंदोलकांच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय अधिक्षक शेटे यांची भेट घेवून रुग्णालयाच्या दूरावस्थेबाबत विचारणा केली. यावेळी त्यांना मागणीचे निवेदन सादर करुन आपल्या भावना तीव्र शब्दात मांडल्या. यावेळी वैद्यकीय अधिक्षक शेटे यांनी आरोग्य उप संचालकांना आपल्या भावना कळविण्यात येतील, असे आश्‍वासन दिले. यावेळी सहाय्यक वैद्यकीय अधिक्षक डॉ.श्रीकांत सुर्यवंशी उपस्थीत होते. 

आंदोलनात मिश्रीलाल जाजू, दत्ता माने, आनंदा गुरव, शामराव कुलकर्णी, शिवाजी भोसले, सुनिल बारवाडे, धोंडीबा कुंभार, परशराम आगम, हाजलाल मुल्ला, हणमंत मत्तूर, बंडोपंत सातपूते, अनिल वासुदेव, पार्वती जाधव, शिवानंद पाटील आदी सहभागी झाले होते. यावेळी शिवाजीनगर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: IGM hospital in Ichalkaranji