बेकायदेशीर गर्भपात प्रकरणः सांगली, कोल्हापुरातील 14 महिलांची चौकशी

विजय पाटील
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

सांगली - गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये तब्बल 14 महिलांचा गर्भपात केल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलीस उपअधिक्षक अशोक वीरकर यांनी दिली.

सांगली - गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये तब्बल 14 महिलांचा गर्भपात केल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलीस उपअधिक्षक अशोक वीरकर यांनी दिली.

म्हैसाळ येथील गर्भपात व भ्रूणहत्याकांडाने राज्य हादरून गेले होते. डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेसह १४ संशयितांना अटक केली होती. या प्रकरणाला अजून वर्ष पूर्ण झाले नाही, तोपर्यंत चार दिवसांपूर्वी सांगलीतही गर्भपात व भ्रूणहत्येचे प्रकरण उघडकीस आले. नऊ महिलांचा गर्भपात केल्याची कागदपत्रे व त्यांचे केसपेपर सापडले होते. या सर्व महिला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. मात्र हा आकडा वाढला आहे. पोलिसांनी चौकशी केली असता हा आकडा 14 वर गेला आहे. त्यांना आज सकाळी चौकशीसाठी बोलाविले होते.

या महिला पतीसह सकाळी अकरा वाजता पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या कार्यालयात आल्या. प्रत्येक महिलेची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. या महिलांनी गर्भपात कधी केला? गर्भपात करण्यामागे काय कारण होते? त्यांना गर्भपातासाठी चौगुले हॉस्पिटलमध्ये कोणत्या डॉक्टरने पाठविले? सोनोग्राफी तपासणी कुठे केली? या सर्व बाबींचा उलगडा जबाबातून करण्यात आला. याशिवाय संंबंधित महिलांच्या पतींकडेही चौकशी करण्यात आली. 

Web Title: Illegal Abortion Case Sangli Follow Up