
महापालिकांनी शहराच्या विकासासाठी आता निधीवर अवलंबून न राहता स्वतःचे ठाणे आणि अन्य शहराच्या धर्तीवर पर्याय शोधले पाहिजेत
सांगली : जिल्ह्यातील महापालिकेसह नगरपालिकांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. राज्य सरकारने गुंठेवारी नियमितीकरण आणि वाढीव एफएसआयमुळे राज्यातील घरांच्या किंमती कमी येतील. यापुढील काळात गुंठेवारी वाढणार नाही याची जबाबदारी सबंधित स्थानिक स्वराज्य यंत्रणेची असेल. यापुढे बेकायदा बांधकाम खपवून घेणार नाही, असा इशारा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिला.
सांगली, मिरज, कुवपाड महापालिकेसह जिल्ह्यातील नगरपंचायतींच्या विकास कामांचा आढावा, विविध प्रश्न, प्रलंबीत मागण्यांबाबत मंत्री शिंदे यांची आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमन पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महापालिका आयुक्त नितिन करीर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले," राज्यात बांधकामांबाबत एकच सुस्पष्ट नियमामुळे विकास नियमावली कायदा आणि गुंठेवारी नियमितीकरणामुळे सामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे मिळतील. महापालिकांनी शहराच्या विकासासाठी आता निधीवर अवलंबून न राहता स्वतःचे ठाणे आणि अन्य शहराच्या धर्तीवर पर्याय शोधले पाहिजेत. यापुढे अनधिकृत बांधकामे होणार नाहीत याची जबाबदारी सबंधित संस्थेची राहिल.
हेही वाचा- पहिल्या टप्प्यात सांगली जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रातील 22 हजार जणांना लस -
'
मंत्री शिंदे म्हणाले,
-गरपालिकांना त्रांतिक अधिकारी डेप्युटेशनवर देणार
-आटपाडी नगरपालिकेसाठी सुधारित प्रस्ताव पाठवा
-साहित्यिक ग. दि. माडगूळकराच्या नाट्यगह जागेसाठी सकारात्मक निर्णय
निधी खर्चाचे नियोजन, अंमलबजावणी, गुणवत्ता व वेळेचे बंधन पाळा
सर्वच नगरपालिकांच्या विकासासाठी निधी देणार
भंडाऱ्यांच्या घटनेची पुनरावृत्ती नको...मंत्री शिंदे
मंत्री . शिंदे म्हणाले,भंडारा येथील दहा बालकांची घटना निषेधार्ह आहे. या घटनेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यापुढे अशी घटना घडणार नाही याची सबंधित विभागावर जबाबदारी राहिल.