ग्रामपंचायतींवर जुन्या धोरणानुसार तत्काळ प्रशासक नियुक्ती

अजित झळके
Thursday, 6 August 2020

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर तत्काळ प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्याचा प्रस्ताव तयार आहे. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सही होताच तेथे विस्तार अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त होतील. 

सांगली : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर तत्काळ प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्याचा प्रस्ताव तयार आहे. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सही होताच तेथे विस्तार अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त होतील. 

ऑगस्टमध्ये 88 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. तेथे प्रशासक नियुक्ती होईल. या प्रक्रियेबाबत न्यायालयात खटला दाखल आहे. त्याच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे. तो येईपर्यंत जुन्या धोरणानुसारच प्रशासक नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्यातील 15 हजार तर जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींची मुदत यावर्षी संपत आहे. त्यापैकी 3 ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्टमध्ये संपली. ऑगस्टमध्ये 88 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या ठिकाणी गावातील व्यक्तीला प्रशासक म्हणून नियुक्त करावे, असे आदेश ग्रामविकास विभागाने जारी केले होते. त्याला न्यायालयात आव्हान दिले गेले.

प्रशासक म्हणून शासकीय अधिकारीच असावेत, अशी मागणी आहे. त्यावर सुनावणी सुरु आहे. न्यायालयाचा निकाल बाकी आहे. तो येईपर्यंत कारभार कुणी पहायचा, जबाबदार कोण, याबाबत संदिग्धता होती. ती दूर करत जिल्हा परिषदेने जुन्या धोरणानुसार प्रशासक नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विस्तार अधिकारी किंवा त्याहून वरिष्ठांची नेमणूक केली जाणार आहे. त्याविषयीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहीने पारीत केले जाणार आहे. त्याचा प्रस्ताव तयार आहे. एकेका विस्तार अधिकाऱ्याकडे पाच ते सहा ग्रामपंचायतींचा कारभार येऊ शकतो, अशी प्राथमिक माहिती आहे. 
 

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या 

जुलै महिना : 3 
5 ऑगस्टपर्यंत ः 46 
6 ऑगस्ट ः 7 
7 ऑगस्ट ः 9 
8 ऑगस्ट ः 8 
9 ऑगस्ट ः 13 
10 ऑगस्टनंतर ः 5 

मुदत संपलेल्या तीन आणि संपत असलेल्या 88 ग्रामपंचायतींवर जुन्या निकषानुसार प्रशासक नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विस्तार अधिकारी किंवा त्याहून वरच्या पदावरील व्यक्ती प्रशासक असेल. ग्रामपंचायत, कृषी, सांख्यिकी, शिक्षण आदी विभागातील विस्तार अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवली जाईल. एक-दोन दिवसांत नियुक्‍त्या होतील. 
- तानाजी लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी 

इथे तत्काळ प्रशासक 
* कडेगाव तालुका ः अंबक, ढाणेवाडी, कान्हरवाडी, कोतिज, रामपूर, शिरसगाव, शिवणी, सोनकिरे, येतगाव. 
* आटपाडी तालुका ः तळेवाडी, शेटफळे, पात्रेवाडी, लेंगरेवाडी, माडगुळे, घरनिकी, बोंबेवाडी, देशमुखवाडी, धावडवाडी, विठ्ठलापूर. 
* वाळवा तालुका ः भाटववाडी 
* जत तालुका ः अंकले, अंकलगी, भिवर्गी, धावडवाडी, डोर्ली, घोलेश्‍वर, गुड्डापूर, गुगवाड, जालिहाळ खुर्द, कारेवाडी, कुडनर, कुलालवाडी, लमानतांडा द., लमानतांडा उटगी, मेंढिगिरी, मोरबगी, निगडे बुद्रुक, सनमडी, शेड्याळ, शेगाव, सिद्धनाथ, शिंगनहळ्ळी, सोनलगी, तिकोंडी, टोणेवाडी, उंटवाडी, उटगी, वळसंग, येळदरी. 
* मिरज तालुका ः आरग, भोसेल, चाबकस्वारवाडी, ढडोंगरवेडा, एरंडोली, कळंबी, लक्ष्मीवाडी, लिंगनूर, मालगाव, मल्लेवाडी, शिंदेवाडी, शिपूर, तानंग, विजयनगर. 
* शिराळा तालुका ः बिळाशी, जांभळेवाडी 
* खानापूर तालुका ः नागेवाडी, माहुली, भिकवडी, तांदळगाव, खंबाळे भा., मंगरुळ, देवेखिंडी, पारे, रेणावी, मेंगानवाडी, पोसेवाडी, शेंडगेवाडी, भडकेवाडी. 
* कवठेमहांकाळ तालुका ः नांगोळे, इरळी, चोरोची, तांभूळवाडी, तिसंगी, थबडेवाडी, निमज, बनेवाडी, निमज, बनेवाडी, मोघमवाडी, म्हैसाळ एम, रायवाडी. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immediate appointment of administrators on Gram Panchayat