maratha reservation
maratha reservationesakal

Maratha Reservation : पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा समाजातील मुलांना तातडीने द्या दाखले!

सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
Published on

Sangli News : बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा समाजातील मुलांना तातडीने एसईबीसी दाखले तातडीने उपलब्ध करून द्यावेत. ई-सेवा केंद्रातून दाखले देण्यास विलंब होत असल्याची तक्रार सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे आज एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

क्रांती मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने २७ फेब्रुवारी २०२४ रोजी एसईबीसी प्रवर्ग बनवून मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शासनाने जातप्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र वाटपाचे आदेश दिलेले आहेत.

सद्यःस्थितीला शासनाने अनेक विभागाच्या नोकरभरतीसंदर्भात जाहिरात बदलून एसईबीसी पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. याशिवाय काल घोषित झालेला बारावी निकाल लक्षात घेता लवकरच शैक्षणिक प्रवेशाला सुरुवात होणार आहे.

शासकीय सेवेसाठी अर्ज करणारे सर्व उमेदवार व शैक्षणिक प्रवेश यासाठी ई-सेवा केंद्राकडून दाखले देण्यास विलंब केला जात असून ही प्रकरणे तहसीलदार कार्यालयात प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.

maratha reservation
Manoj Jarange: मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणांचं हत्यार; या तारखेपासून ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा सुरू करणार आंदोलन

हीच अवस्था सर्व समाजातील लोकांबाबत आहे. निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली दाखले द्यायला होत असलेला विलंब दूर करण्यासाठी तत्काळ सर्व तालु‌का तहसीलदारांना देण्यात यावेत, प्राधान्यक्रमाने जातप्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अशी महत्त्वाची कागदपत्रे गतीने मिळावीत.

याबाबत जिल्हा प्रशासनाने सर्व तालुक्यांना तातडीने दाखले देण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले. निवेदनावर गजाजन साळुंखे, राहुल पाटील, आनंद देसाई, सतीश साखळकर, प्रशांत भोसले, नितीन चव्हाण, उमेश देशमुख, अवधूत सूर्यवंशी, देव मोरे, शंभूराज काटकर, रुपेश मोकाशी, अमृतराव सूर्यवंशी आदींची स्वाक्षरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com