विसर्जन करून "सातच्या आत घरात', ग्रामीण भागात शिस्त

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 August 2020

गणेशोत्सवात कोरोनाबाबतचे सर्व नियम व निकष पाळले जावेत, यासाठी पोलिसांनी ग्रामीण भागातही कडक शिस्तीचा अंमल सुरु केला आहे. त्यानुसार गणरायाचे विसर्जन करून "सातच्या आत घरात' हा दंडक लावला आहे. त्याला सर्व मंडळांनी प्रतिसाद दिला असून त्यामुळे गर्दी टाळण्यात यश आले आहे. 

सांगली ः गणेशोत्सवात कोरोनाबाबतचे सर्व नियम व निकष पाळले जावेत, यासाठी पोलिसांनी ग्रामीण भागातही कडक शिस्तीचा अंमल सुरु केला आहे. त्यानुसार गणरायाचे विसर्जन करून "सातच्या आत घरात' हा दंडक लावला आहे. त्याला सर्व मंडळांनी प्रतिसाद दिला असून त्यामुळे गर्दी टाळण्यात यश आले आहे. 

यंदा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने सुरु आहे. पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि आठव्या दिवशीच्या गणरायाचे विसर्जन झाले आहे. पुढे तीन दिवस कार्यक्रम चालणार आहे. त्यात ग्रामीण भागात अत्यंत शिस्तीचे दर्शन घडत आहे. यावर्षी गणरायाच्या आगमणावेळी अजिबात गर्दी केली नाही. बाप्पांचे स्वागत साधेपणाने झाले आणि अध्यक्ष किंवा कार्यकर्त्यांच्या घरीच बाप्पांची मुर्ती विराजमान झाली. महापुजा झाल्या, मात्र महाप्रसाद टाळण्यात आला. देखावे केले गेले नाहीत.

हे सारे शिस्तबद्ध झालेच. आता विसर्जन करतानाही कडक शिस्त पाळली जात आहे. रात्री उशीरापर्यंत मिरवणुका काढून विसर्जनाला बंदी आहेच, शिवाय यावेळी सायंकाळी सातच्या आत विसर्जन करून सर्व सदस्यांनी आपापल्या घरात जावे, असा कडक नियम करण्यात आला आहे. त्याला सर्व मंडळाच्या सदस्यांनी प्रतिसाद दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: By immersion "in the house within seven", discipline in rural areas

Tags
टॉपिकस
Topic Tags: