
मिरज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) वंचित बहुजन आघाडी ताकदीने लढविणार असल्याचे पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी स्पष्ट केले. ते जिल्हा कार्यकारिणी तसेच कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, संपर्कप्रमुख नझीरहुसेन झारी, जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे प्रमुख उपस्थित होते.